Shehnaaz Gill Sidharth Shukla : बॉलिवूडमधील अनेक कलाकार मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करतात. शहनाज गिलदेखील (Shehnaaz Gill) अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे.'बिग बॉस'मुळे (Bigg Boss) शहनाजला लोकप्रियता मिळाली आहे. शहनाज आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) रिलेशनमध्ये होते. पण सिद्धार्थआधी शहनाज एका वेगळ्याच अभिनेत्याला डेट करत असल्याचं समोर आलं आहे.
'बिग बॉस'च्या घरात जडलं प्रेम
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. 'बिग बॉस 13'मध्ये शहनाजने खुलासा केला होता की,"बी-टाउनचा सुपरस्टार कार्तिक आर्यन माझा क्रश आहे. कार्तिकला अनेकदा तिने सोशल मीडियावर मेसेजदेखील केला आहे. पण कार्तिकने शहनाजकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. 'लव आज कल'च्या प्रमोशनसाठी कार्तिक आर्यन 'बिग बॉस 13'मध्ये सारा अली खानसोबत (Sara Ali Khan) आला होता. त्यावेळी शहनाजने नॅशनल टीव्हीवर कार्तिकला प्रपोज करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शहनाज आणि सिद्धार्थ 'बिग बॉस 13'च्या घरात एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
'बिग बॉस 13'मध्ये (Bigg Boss 13) सिद्धार्थ आणि आसिम रियाजच्या जोडीचीदेखील चांगलीच चर्चा रंगली. दोघांमधील मैत्री, प्रेम आणि भांडण प्रेक्षकांना आवडत होतं. या कार्यक्रमात अनेकदा त्यांच्यात वाद झाले. पण बिग बॉस संपल्यानंतर त्यांच्यातील मैत्री आणखी वाढली.
राघवला डेट करतेय शहनाज गिल
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला रिलेशनमध्ये होते. 2 सप्टेंबर 2021 रोजी सिद्धार्थचं निधन झालं. त्यानंतर शहनाज सिंगल होती. इंडिया फोरम्सच्या रिपोर्टनुसार, शहनाज डान्सर आणि अभिनेता राघव जुयालला डेट करत आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शहनाज गिलबद्दल जाणून घ्या.. (Who is Shehnaaz Gill)
शहनाज गिल ही लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहे. अनेक पंजाबी आणि हिंदी मालिका आणि सिनेमांत तिने काम केलं आहे. शहनाजने 2015 मध्ये मॉडेलिंगच्या करिअरची सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच तिचे किसी का भाई किसी की जान आणि थँक्यू फॉर कमिंग हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. शहनाजच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या