Animal OTT Release : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनीत 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे.
रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा 'अॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. आज रिलीजच्या एक महिन्यानंतरही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. 'अॅनिमल' हा सिनेमा 2023 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला होता.
ओटीटीवर पाहायला मिळणार अनकट सीन्स
'अॅनिमल' हा सिनेमा रिलीज झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा करत आहे. ओटीटीवर या सिनेमातील अनकट सीन्स पाहायला मिळणार असल्याने काही सिनेप्रेमींना पुन्हा एकदा हा सिनेमा पाहायचा आहे. या सिनेमात बाप-लेकाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. वडिलांचं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या मुलाची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे.
'अॅनिमल' या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. आता प्रेक्षकांना फक्त या सिनेमाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा आहे. 'अॅनिमल'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे.
'अॅनिमल' ओटीटीवर कधी येणार? (Animal OTT Release)
मीडिया रिपोर्टनुसार, 'अॅनिमल' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. ट्रेंड्सनुसार, सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर 45-60 दिवसांत सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत असतो.
'अॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection)
'अॅनिमल' या सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार केला होता. भारतात या सिनेमाने 540.84 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात या सिनेमाने 882.40 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. 'टायगर 3','गदर 2' आणि 'पठाण'चाही रेकॉर्ड या सिनेमाने ब्रेक केला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित हा सिनेमा लवकरच 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.
संबंधित बातम्या