Ranbir Kapoor on Animal Trolling : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. एकीकडे जगभरात कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र या सिनेमाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. आता बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने दाखवून दिलं, असं म्हणत रणबीर कपूरने 'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगवर रणबीरने सोडलं मौन


'अ‍ॅनिमल' वॉयलेंस आणि वल्गेरिटीसह अनेक डायलॉग्समुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेकांनी या सिनेमात दाखवण्यात आलेल्या हिसेंवर टीका केली. दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलच कलेक्शन जमवलं. नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी पार पडली. या पार्टीत 'अ‍ॅनिमल'च्या संपूर्ण स्टारकास्टने हजेरी लावली होती. 


बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने दाखवून दिलं : रणबीर कपूर


पीटीआयच्या माहितीनुसार, 'अ‍ॅनिमल'च्या ट्रोलिंगबद्दल बोलताना रणबीर कपूर म्हणाला,"अ‍ॅनिमल'ला मिळत असलेल्या यशाबद्दल सर्वांचे आभार. अनेकांनी या सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. सिनेमावर टीकाही झाली. पण बॉक्स ऑफिसवरच्या कमाईने दाखवून दिलं आहे की चांगला सिनेमा असेल तर त्याचं कौतुक करा किंवा टीका करा तो चालतोच". 


'अ‍ॅनिमल'ची छप्परफाड कमाई (Animal Box Office Collection)


'अ‍ॅनिमल' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडला आहे. रिलीजच्या 40 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 550 कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने इतिहास रचला आहे. संदीप कुमार रेड्डीने 'अॅनिमल'च्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रणबीर कपूरसह रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर आणि तृप्ती डिमरी हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 






'अ‍ॅनिमल' ओटीटीवर कधी येणार? (Animal OTT Release)


मीडिया रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होऊ शकतो. ट्रेंड्सनुसार, सिनेमागृहात रिलीज झाल्यानंतर 45-60 दिवसांत सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येत असतो.


संबंधित बातम्या


Animal OTT Release : बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर रणबीरचा 'अ‍ॅनिमल' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कधी अन् कुठे पाहता येईल