एक्स्प्लोर

रणबीरकडूनही झणझणीत अंजन, फेअरनेस क्रीमची अॅड नाकारली?

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता अभय देओलने फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींवर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली होती. मात्र अभयने फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारणाऱ्या काही कलाकारांचं कौतुकही केलं होतं. त्यापैकीच एक असलेला बॉलिवूडचा चॉकलेट हिरो रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची जाहिरात पुन्हा नाकारली आहे. बॉलिवूडमधील आठ-दहा कलाकारांचे फोटो फेसबुकवर पोस्ट करुन अभय देओलने सणसणीत चपराक लगावली होती. अभयच्या पोस्टला सोनम कपूरचा अपवाद वगळता कोणीच उत्तर दिलं नव्हतं. आता रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची 9 कोटींची जाहिरात नाकारल्याचं वृत्त 'स्पॉटबॉय' या वेबसाईटने दिलं आहे. अभयपाठोपाठ रणबीरचं कृत्य इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं ठरणार आहे.

फेअरनेस क्रीमचा विरोध, अभयचा शाहरुख, दीपिका, विद्यावर निशाणा

2011 मध्येही रणबीर कपूरने फेअरनेस क्रीमची जाहिरात करण्यास नकार दिला होता. अशी उत्पादन वर्णद्वेषाला प्रोत्साहन देत असल्याचं मत रणबीर कपूरने व्यक्त केलं होतं. अभिनेत्री कंगना रनौत, अनुष्का शर्मा यांनीही अशाचप्रकारे गोरेपणाचं आश्वासन देणाऱ्या क्रीमची जाहिरात नाकारली होती.

गोऱ्या रंगाचं अवडंबर, फेअरनेस क्रीमची जाहिरात नाही करणार, अनुष्काचा कौतुकास्पद निर्णय

शाहरुख खान, दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, विद्या बालन, जॉन अब्राहम, एलियाना डिक्रुझ, सोनम कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा, नंदिता दास यासारख्या डझनभर कलाकारांच्या फेअरनेस क्रीमच्या जाहिरातींचे फोटो अभय देओलने फेसबुकवर पोस्ट केले होते. प्रत्येक पोस्टमध्ये एखादी टिपण्णी लिहून अभय देओलने वर्णभेदाचा विरोध केला होता. फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीआड काळा-गोरा असा वर्णभेद निर्माण केला जातो. ब्रँड अॅम्बेसेडर असणारे कलाकार जाहिरातीतून त्वचा उजळ करण्याचा पोकळ दावा करतात. यामुळे केवळ वर्णभेदाला खतपाणी मिळतं. म्हणून चित्रपट कलाकारांनी त्यात पडू नये, असा सल्ला त्याने दिला होता.

म्हणून कंगनाने दोन वर्षांपूर्वी नाकारली होती 2 कोटींची जाहिरात!

वर्णभेदाचा ठाम विरोध करणारी अभिनेत्री नंदिता दास, बंडखोर अभिनेत्री कंगना रनौत, हरहुन्नरी अभिनेता रणदीप हुडा, चॉकलेट हिरो रणबीर कपूर, अभिनेत्री स्वरा भास्कर यांचं अभयने कौतुक केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan in Alliance: 'मला वाटतं रितेशची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
'मला वाटतं रितेशची नोकरी धोक्यात...' सलमान खानची 'अलायन्स'मध्ये एन्ट्री, भावाची विचारपूस करत म्हणाला...
Prapti Redkar on harassment: 'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
'डोक्यात फोन टाकला अन् प्रायव्हेट पार्टवर मारलं'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने छेड काढणाऱ्याला घडवली अद्दल, रेल्वे स्थानकावर काय घडलं?
Maitreya Marathi Film: मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
मैत्रीच्या रंगांची नवी गोष्ट! ‘मैत्रेया’चा पोस्टर आऊट; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
Saurabh Choughule Ajinkya Rahane: अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...
अजिंक्य राहाणेचा क्रिकेटला अखेरचा रामराम, अन् मराठी अभिनेत्याला आलं भरून, लहानपणीचा फोटो केला शेअर, म्हणाला...

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget