Ramayana : बॉलिवूडचे लोकप्रिय सिने-दिग्दर्शक नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांचा 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा रिलीजआधीपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमा संदर्भात अनेक अपडेट्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी 'रामायण'मध्ये टीव्ही स्टार रवी दुबे (Ravi Dubey) यांची एन्ट्री झाल्याचं समोर आलं होतं. रवी दुबे यांच्याआधी अनेक कलाकारांची 'रामायण'मध्ये एन्ट्री झाली आहे. आता या चित्रपटात आणखी एका टीव्ही स्टारची एन्ट्री झाली आहे. 'रामायण'मध्ये माता कौशल्याच्या भूमिकेत (Mata Kaushalya) कोण झळकणार हे आता समोर आलं आहे. सिनेमात रणबीरच्या आईच्या भूमिकेसाठी एका टीव्ही स्टारला विचारणा झाली आहे.


'माता कौशल्या'च्या भूमिकेत झळकणार 'ही' अभिनेत्री (Ramayana India Krishnan Play Mata Kaushalya Role)


रणबीर कपूरचा 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण'मध्ये रणबीर कपूरने रामाच्या भूमिकेसाठी नॉन-व्हेजचा त्याग केला आहे. रणबीर कपूरसह या सिनेमातील एन्ट्रीबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. आतापर्यंत या सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकारांची एन्ट्री झाली आहे. आता या सिनेमातील माता कौशल्याच्या भूमिकेसाठी एका टीव्ही अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, टीव्ही स्टार इंदिरा कृष्णन (Indira Krishnan) माता कौशल्याच्या भूमिकेत झळकणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. निर्मात्यांनी आतापर्यंत सिनेमातील स्टारकास्टबाबत काहीही खुलासा केलेला नाही. माता कैशल्याच्या भूमिकेसाठी इंदिरा कृष्णन यांचं नाव समोर आलं आहे. त्यामुळे चाहतेही आनंदी झाले आहेत. 


'रामायण'मध्ये या कलाकारांची एन्ट्री (Ramayana Movie Starcast)


'रामायण' या सिनेमात आतापर्यंत अनेक बॉलिवूड आणि टीव्ही स्टारची एन्ट्री झाली आहे. सीता मातेच्या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ते दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) यांच्या नावाची चर्चा आहे. तर शूर्पणखाच्या भूमिकेसाठी रकुल प्रीत सिंहला विचारणा झाली आहे. आता रणबीरची आई अर्थात कौशल्या मातेच्या भूमिकेसाठी इंदिरा कृष्णनला विचारणा झाल्याचं समोर आलं आहे.


'रामायण' या सिनेमाची 600 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 2025 च्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रणबीरने आता या सिनेमासाठी काम करायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी चॉकलेट बॉय रणबीर कपूरचा जीममध्ये घाम गाळतानाचा फोटो समोर आला होता. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता या सिनेमाची कमालीची उत्सुकता आहे. लवकरच निर्माते या सिनेमासंदर्भात माहिती देतील.


संबंधित बातम्या


Ramayana : 'रामायण'साठी रणबीर कपूर गाळतोय घाम; दारू आणि नॉन-व्हेजचा त्याग केल्यानंतर आता घेतोय खास ट्रेनिंग; पाहा फोटो