Ramayan :   सध्या नितेश तिवारी यांच्या बिग बजेट 'रामायण' (Ramayan) चित्रपटाची चर्चा सुरू आहे.  सध्या या चित्रपटाची कास्टिंग आणि निर्मितीबाबत अपडेट्स येत आहेत. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तीरेखेबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. शूर्पणखेच्या व्यक्तीरेखेबाबत अपडेट समोर आली आहे. नितेश तिवारी यांच्या रामायणात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ही शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रकुलसोबत या शूर्पणखेच्या भूमिकेसाठी चर्चा सुरू आहे. 


'पिंकविला'च्या वृ्त्तानुसार, रामायणमधील शूर्पणखाच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक नितेश तिवारी रकुल प्रीतच्या संपर्कात आहेत. रकुल तयार झाल्यास ती या चित्रपटात रावणाच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. रकुल प्रीत सिंह 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका करणाऱ्या यशच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. 


शूर्पणखाच्या भूमिकेसाठी रकुलने दिली लूक टेस्ट


'रामायण' मध्ये शूर्पणखेची व्यक्तीरेखा महत्त्वाची ठरते. शूर्पणखेमुळे राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले. त्यामुळे  शूर्पणखेची व्यक्तीरेखा या चित्रपटात महत्त्वाची ठरणार आहे. रकुल प्रीत सिंहने शूर्पणखाच्या भूमिकेसाठी लुक टेस्ट दिल्याचा दावा या वृत्तात केला आहे. सगळ्या चर्चा योग्य ठरल्यास रकूल प्रीत लग्नानंतर  चित्रीकरण करणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी रकुल गोव्यात जॅकी भगनानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 


'रामायण' चित्रपटात कोणत्या कलाकारांची चर्चा?


या 'रामायण' सिनेमात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीताच्या भूमिकेत साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. तर रावणच्या भूमिकेत यश दिसत आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलसोबत (Sunny Deol) निर्मात्यांचं बोलणं सुरू आहे. कुंभकर्णाच्या भूमिकेत बॉबी देओल दिसणार आहे. 


'रामायण' कधी रिलीज होणार? (Ramayana Release Date)


'रामायण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सनी देओल आणि यशची झलक पाहायला मिळणार आहे. जुलै 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.