Ramayan Movie Updates : नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटाची (Ramayan Movie) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटात झळकणाऱ्या स्टारकास्टबद्दल लोकांची उत्सुकता वाढवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbeer Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) यांची मुख्य भूमिका असणार आहे. त्याशिवाय या चित्रपटात इतर महत्त्वाच्या व्यक्तीरेखेतही तगडी स्टारकास्ट असणार आहे. आता या चित्रपटाशी निगडीत नवीन माहिती समोर आली आहे. मोठ्या पडद्यावरील रामायणात आता छोट्या पडद्यावर प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (Arun Govil) यांची एन्ट्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


या चित्रपटाशी संबंधित एका जवळच्या सूत्राने 'ईटी टाइम्स'ला सांगितले की, या चित्रपटात बिग बी नाही तर अरुण गोविल राजा दशरथची भूमिका साकारणार आहेत. अरुण गोविल हे रामानंद सागर यांचे 'रामायण' आणि आजचे 'रामायण' यांच्यात एक खास कनेक्शन असणार आहे. याआधी  बिग बी अमिताभ बच्चन हे राजा दशरथ यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता नवीन अपडेट्सनुसार, या रामायणमध्ये आता अमिताभ नव्हे तर अरुण गोविल हे राजा दशरथ यांची भूमिका साकारणार आहेत.  


प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीरची तयारी


याशिवाय, प्रभू श्रीरामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूर देहयष्टीवर फार मेहनत घेणार नसल्याचे म्हटले जात आहे. रणबीर कपूर या चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करणार नाही. नितेश तिवारी रणबीरला या भूमिकेत नॅचरल लूकमध्ये ठेवू इच्छितो. 


शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार ग्लॅमरस अभिनेत्री 


'रामायण' चित्रपटात अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) ही शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रकुलसोबत या शूर्पणखेच्या भूमिकेसाठी चर्चा सुरू आहे. रकुल प्रीत सिंहने शूर्पणखाच्या भूमिकेसाठी लुक टेस्ट दिल्याचा दावा या वृत्तात केला आहे. सगळ्या चर्चा योग्य ठरल्यास रकूल प्रीत लग्नानंतर  चित्रीकरण करणार आहे. 21 फेब्रुवारी रोजी रकुल गोव्यात जॅकी भगनानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 


'रामायण' चित्रपटात कोणत्या कलाकारांची चर्चा?


या 'रामायण' सिनेमात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीताच्या भूमिकेत साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. तर रावणच्या भूमिकेत यश दिसत आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलसोबत (Sunny Deol) निर्मात्यांचं बोलणं सुरू आहे. कुंभकर्णाच्या भूमिकेत बॉबी देओल दिसणार आहे. 


'रामायण' कधी रिलीज होणार? (Ramayana Release Date)


'रामायण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सनी देओल आणि यशची झलक पाहायला मिळणार आहे. जुलै 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.