Ramanand Sagar Ramayana Actress Sulakshana Khatri : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या 'रामायण' (Ramayana) या मालिकेने 1987 मध्ये भारताच्या छोट्या पडद्याचा चेहरा बदलला. आजही या आयकॉनिक मालिकेची क्रेझ कायम आहे. या मालिकेतील सर्व पात्रांना आजही त्यांच्या 'रामायण'मधील भूमिकांमुळे ओळखलं जातं. 'रामायण'मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल (Arun Govil) असो किंवा सीता मातेच्या भूमिकेत दिसणाऱ्या दीपिका चिखलिया (Dipika Chikhlia) असो. सर्वांनीच आपल्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अनेक कलाकार आज हयात नाहीत. तर काही मनोरंजनसृष्टीपासून दूर आहेत. 'रामायण'मध्ये प्रभू राम यांचा भाऊ भरत यांची पत्नीची भूमिका साकरणारी अभिनेत्री सुलक्षणा खत्री (Sulakshana Khatri) आज कुठे आहे जाणून घ्या...


'रामायण'मधील 'मांडवी' आज कुठे आहे? 


'रामायण' मालिकेत अभिनेत्री सुलक्षणा खत्रीने (Sulakshana Khatri) 'मांडवी' हे पात्र साकारलं आहे. मांडवी या पात्राला सुलक्षणाने योग्य न्याय दिला होता. आपल्या सौंदर्याने आणि साधेपणाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. 'मांडवी'चं पात्र साकारणाऱ्या सुलक्षणाच्या कामाचं आजही प्रचंड कौतुक होतं. 'रामायण' मालिकेनंतर ती रामानंद सागर यांच्या 'कृष्णा' मालिकेत रोहिणीच्या भूमिकेत झळकली होती. तसेच संजीवनी, अलिफ लैला, महाराज की जय हो, जाना ना दिल से दूर, कुल्फी कुमार बाजेवाला, सपना बाबुल का बिदाई आणि लव कुशसारख्या मालिकांमध्ये सुलक्षणाने काम केलं आहे.






सुलक्षणा आजही मनोरंजनक्षेत्रात सक्रीय


सुलक्षणा खत्री यांनी 'मांडवी' ही भूमिका साकारुन आता 37 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षात त्यांचा अंदाज पूर्णपणे बदलला आहे. सौंदर्याच्या बाबतीत त्या आघाडीवर आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना सौंदर्याच्या बाबतीत टक्कर देत आहेत. सुलक्षणा मनोरंजनक्षेत्रात सक्रीय असण्यासोबत सोशल मीडियावरदेखील अॅक्टिव्ह आहेत.


'रामायण' या लोकप्रिय मालिकेचं 1987 मध्ये प्रसारण झालं होतं. त्यावेळी ही मालिका चांगलीच गाजली. आजही या मालिकेतील प्रसंग, पात्र, संगीताचं कौतुक होतं. आता पुन्हा एकदा ही मालिका छोट्या पडद्यावर पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे.


संबंधित बातम्या


 


Ramayana : 'रामायण'मध्ये प्रभू रामाची भूमिका साकरण्यासाठी किती मिळायचं मानधन? जाणून घ्या छोट्या पडद्यावरी 'राम' अरुण गोविल यांचं नेटवर्थ