Ram Setu Box Office Collection: बॉलिवूडमधील  अभिनेता  अक्षय कुमारच्या  (Akshay Kumar)   आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. राम सेतू (Ram Setu) हा चित्रपट 26 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला.  या चित्रपटात अक्षयसोबतच जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरूचा आणि सत्यदेव कंचरण या कलाकरांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात झाली आहे. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या  कमाईत घसरण झाली. आता तिसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं तिसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन...


रिलीज झाल्यानंतर दोन दिवसात 26 कोटींची कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.25 कोटींचे कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी 'राम सेतू'ने 11.40 कोटींची कमाई केली.  तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (27 ऑक्टोबर) 'राम सेतू'ने 7.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 34.45 कोटींवर गेली आहे.  


चित्रपटात अक्षयनं पुरातत्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, ज्याला राम सेतूबाबत संशोधन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चित्रपटातील अक्षयच्या अभिनयाचं  काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन राम सेतू चित्रपटातील VFX, चित्रपटाचं कथानक, कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टीचं कौतुक केलं. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट रिलीज होण्याची उत्सुकतेने वाट बघत होते. 


थँक गॉड या अजय देवगणच्या चित्रपटासोबत अक्षयच्या राम सेतू चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.  राम सेतू या चित्रपटाचं शूटिंग  उटी, दमण- दीव आणि मुंबईच्या जवळ झाले आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. केप ऑफ गुड होप, अॅमेझॉन प्राइम, एबंडंटिया एंटरटेनमेंट आणि लायका प्रॉडक्शन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता अजय देवगणच्या थँक गॉड या चित्रपटासोबत राम सेतू या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली.


राम सेतू या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक शर्मा हे आहेत. अभिषेक शर्मा यांनी यापूर्वी  2020 मध्ये आलेल्या 'सूरज पर मंगल भारी' या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात मनोज बाजपेयी, दिलजीत दोसांझ आणि फातिमा सना शेख या कलारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तरी देखील या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. आता त्यांचा राम सेतू हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्डेस तोडेल की नाही? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Ram Setu Twitter Review: कसा आहे अक्षयचा राम सेतू? चित्रपट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन