एक्स्प्लोर

...अन्यथा कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन : राम कदम

मुंबई: येत्या २४ तासात कॉमेडियन कपिल शर्मानं लाचखोर अधिकाऱ्यांचं नाव उघड करावं, अन्यथा त्याच्या घराबाहेर आंदोलन छेडू, असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिला आहे. मुंबईत कार्यालय उभारण्यासाठी महापालिकेतल्या एका अधिकाऱ्यांनं ५ लाखांची लाच मागितली असा आरोप काल ट्विटरद्वारे कपिल शर्मानं  केला. मात्र, नंतर ज्या वर्सोव्यात  कपिल शर्मानं कार्यालय उभारलंय, तेच मुळात अनधिकृत असल्याचं समोर आलं.. कपिलनं वर्सोव्यात एका मजल्याऐवजी अनधिकृतपणे तीन मजले उभारले आहेत. त्यासाठी खारफुटीचं जंगलही तोडल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्याने तसंच मनसेनेही केला आहे. काय आहे प्रकरण ? कपिल शर्माने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे ट्वीट करुन महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी बांधकामाच्या मंजुरीसाठी 5 लाख मागितल्याचा आरोप केला. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 15 कोटींचा टॅक्स भरल्याची आठवणही त्याने करुन दिली. शिवाय ‘हेच का अच्छे दिन?’ असा खोचक सवालही विचारला. पण ट्वीटला काही तास उलटण्याच्या आधीच कपिलचं हे ट्विटरास्त्र त्याच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. ज्या बांधकामासाठी लाच मागितली गेली, ते वर्सोव्यातील ऑफिसचं बांधकामच अवैध असल्याचा दावा स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राजेश मुदगल यांनी केला आहे. वर्सोव्याच्या ज्या भागात हे ऑफिस थाटलं जातंय, तो भाग, रहिवाशी बांधकामासाठी राखीव आहे. पण त्याच भागात व्यावसायिक बांधकाम सुरु असल्याचा आरोप आहे.   कपिलच्या या प्रतिक्रियेनंतर विरोधकांसह महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपनंही लाचखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाचखोर अधिकाऱ्याचं नाव कपिल शर्मानं उघड करावं असं आवाहन मुंबई पालिकेनं केलंय. याप्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ट्वीटद्वारे दिलं आहे. संबंधित बातम्या : लाचखोरीत मध्यस्थीचा पुरावा द्या अन्यथा…, कपिलला मनसेचा इशारा कपिल शर्माचं ऑफिसच वादात, ते ट्विट कपिलवरच उलटणार? कपिल भाई, लाचखोराचं नाव सांग, त्याला सोडणार नाही : मुख्यमंत्री कपिलचा मुखवटा घालून नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल बीएमसीने 5 लाखांची लाच मागितली : कपिल शर्मा

महत्त्वाच्या बातम्या

'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
'तेव्हा डिप्रेशनमध्ये गेलेले, सगळं असूनही काहीच नसल्यासारखं वाटायचं...'; सांगलीच्या वादानंतर भाग्यश्री पटवर्धनचं 'ते' वक्तव्य चर्चेत
Tukaram Mundhe: तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
तुमच्यासाठी ते स्टार, सेलिब्रिटी असतील पण माझ्या लेखी ते कायदा मोडणारे; शाहरुख खान, अजय देवगणबाबत तुकाराम मुंढेंचं सडेतोड प्रत्युत्तर
Why Dhurandhar Not Chosen For Oscars: मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
मराठमोळ्या 'गोंधळ'समोर 3000 कोटींचा गल्ला जमवणारा 'धुरंधर' फिका ठरला, रणवीर सिंहचा ब्लॉकबस्टर ऑस्करच्या शर्यतीतून का बाहेर पडला?
Mandakini Reaction On Photo With Dawood Ibrahim: 'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं
'मला दाऊदनं इनवाइट...', अंडरवर्ल्ड डॉनसोबतचा 'तो' फोटो, ज्यानं अख्खं आयुष्य बदललं, आता 30 वर्षांनी अभिनेत्री मंदाकिनी यांनी मौन सोडलं

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget