एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राम गोपाल वर्माच्या 'न्युक्लिअर'ची घोषणा, बजेट तब्बल...
मुंबई : प्रसिद्ध सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मेगाबजेट आणि शूटिंग लोकेशन हे असणार आहे. अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणारा हा सिनेमा असणार आहे.
'न्यूक्लिअर' असे या सिनेमाचे नाव असून, मेगाबजेट असा हा सिनेमा आहे. केवळ बॉलिवूडपुरता मर्यादित नसून, आंतरराष्ट्रीय सिनेमांच्या तोडीस तोड असा हा सिनेमा असेल, असे राम गोपाल वर्मा यांचे मत आहे.
तब्बल 340 कोटी रुपये बजेटच्या या सिनेमाची शूटिंग 12 हून अधिक देशात होणार आहे. त्यामुळे शूटिंग लोकेशन आणि बजेटच्या दृष्टीने भारतीय सिनेमाच्या इतिहासातही हा सिनेमा वेगळा ठरेल, यात शंका नाही. 'द बिगिनिंग ऑफ वर्ल्ड वॉर 3' अशी या सिनेमाची पंचलाईन आहे. काश्मीरचा प्रश्न अणुयुद्धाला कसं आमंत्रण देतो, यावर या सिनेमाचं कथानक बेतलं आहे. भारत-पाकिस्तानच्या दृष्टीने काश्मीरचा प्रश्न कायमच महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे या सिनेमात राम गोपाल वर्मा नक्की काय मांडतो आहे, याचीही अनेकांना उत्सुकता लागली आहे.Nuclear to be shot in America,China,Russia,Yemen nd india with American,Chinese,Russian nd Indian actors #RGVNUCLEAR pic.twitter.com/0wiU8MuIeQ
— Ram Gopal Varma (@RGVzoomin) November 7, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement