The India House:  आरआरआर (RRR) या चित्रपटामुळे अभिनेता ता राम चरणला (Ram Charan)  भारतातच नाही तर परदेशात देखील विशेष लोकप्रियता मिळाली. राम चरणच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच राम चरणनं त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव 'द इंडिया हाऊस'  असं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन राम चरणनं त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. 


राम चरण यानं सोशल मीडियावर 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं,  'आपले महान स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर गुरू यांच्या 140 व्या जयंतीनिमित्त  'द इंडिया हाऊस' या पॅन इंडिया चित्रपटाची घोषणा करत आहोत. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर जी हे अभिनेते काम करणार असून दिग्दर्शक राम वामसी कृष्णा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.' 


राम चरण 'द इंडिया हाऊस' या चित्रपटाची निर्मिती करत आहे. राम चरणनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये  'द इंडिया हाऊस'  या चित्रपटांमधील कलाकारांच्या भूमिकांबद्दल देखील सांगण्यात आलं आहे. या चित्रपटात निखिल सिद्धार्थ हा शिवा ही भूमिका साकारत आहे तर ते अनुपम खेर हे  श्यामजी कृष्ण वर्मा ही भूमिका साकारत आहेत. 






अभिनेते अनुपम खेर  यांनी देखील  'द इंडिया हाऊस' या चित्रपटाबद्दल एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, 'आज माझ्या  द इंडिया हाऊस  या अतिशय महत्त्वाच्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. मला या अप्रतिम चित्रपटाचा एक भाग बनवण्यासाठी राम चरण आणि अभिषेक अग्रवाल या माझ्या मित्रांचे मी आभार मानतो. निखिल सिद्धार्थसोबत पुन्हा तुमच्या भेटीस मी येत आहे. जय हो!'






संबंधित बातम्या


Ram Charan : वाढदिवसाला राम चरणकडून चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची घोषणा