IIFA Rocks 2023: नुकताच अबू धाबी (Abu Dhabi) येथे IIFA रॉक्स 2023 (IIFA Rocks 2023) हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यातील ग्रीन कार्पेटवरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)  हे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 


काही दिवसांपूर्वी IIFA 2023 पुरस्कार सोहळ्याची एक पत्रकार परिषद पार पडली होती. या परिषदेत सलमान खान आणि विकी कौशल  यांनी हजेरी लावली होती.  सलमान आणि विकीचा या पत्रकार परिषदेमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानचा सिक्युरिटी गार्ड हा विकी कौशलला ढकलताना दिसला. आता सलमान आणि विकी यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ IIFA रॉक्स 2023 (IIFA Rocks 2023)  या पुरस्कार सोहळ्याच्या ग्रीन कार्पेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा विकीला मिठी मारताना दिसत आहे.


पाहा व्हिडीओ






सलमान खान आणि विकी कौशल यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये दिसले की , विकी कौशल चाहत्यांसोबत सेल्फी काढत आहे, त्याच दरम्यान सलमानचा ताफा तिथे पोहोचतो. सलमान हा अनेक बॉडीगार्ड्ससोबत तिथे येतो. त्या दरम्यान, विकी  सलमानला शेक हँड करण्याचा प्रयत्न करतो मात्र सलमान खान त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यानंतर सलमानचा सिक्युरिटी गार्ड विकीला ढकलतो. 






सलमान खान हा लवकरच टायगर-3 या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबतच कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. तर विकी कौशलचा 'जरा हटके जरा बचके' हा चित्रपट  2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


 संबंधित बातम्या


IIFA 2023 Viral Video: सलमानच्या सिक्युरिटी गार्डनं चक्क विकी कौशलला ढकललं; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले...