Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा शाही लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे. 13 मे 2023 रोजी दिल्लीत त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा सध्या राजस्थानमध्ये आहेत. राजस्थानमध्ये ते त्यांचा वेडिंग वेन्यू फायनल करत आहेत. राजस्थानमधील एका आलिशान महालात राघव-परिणीता लग्नसोहळा होणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचे राजस्थानमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 






परिणीती-राघव 'या' महिन्यात अडकणार लग्नबंधनात


परिणीती-राघव ऑक्टोबर महिन्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे. परिणीती आणि राघव रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. दोघांनाही अनेकदा लंच आणि डिनर डेटला स्पॉट करण्यात आलं आहे. अनेक मुंबई आणि दिल्ली विमानतळावरदेखील दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच आयपीएल पाहण्यासाठी दोघेही स्टेडिअमध्ये गेले होते. आता परिणीती आणि राघव यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. 


परिणीती चोप्रा अन् राघव चड्ढा लग्न कधी करणार? (Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update)


बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा यांच्या लग्नसोहळ्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात ते लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे. अद्याप त्यांच्या लग्नाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दोघेही मुंबईत स्पॉट झाले होते. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोंमध्ये परिणीती लाजताना दिसत होती. 


परिणीती आणि राघव अनेकदा मुंबई किंवा दिल्ली विमानतळावर एकत्र स्पॉट होतात. त्यांनी त्यांचं नातं गुलदस्त्यात ठेवलं असलं तरी पंजाबी गायक हार्डी संधूने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. तसेच आपचे संजीव आरोडा यांनी ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. परिणीती आणि राघव यांची पहिली भेट एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. पुढे त्यांची मैत्री वाढली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 


संबंधित बातम्या


Parineeti Raghav Engagement : खास थीम, प्रमुख पाहुणे, हटके लूक; परिणीती आणि राघवचा रॉयल साखरपुडा