एक्स्प्लोर
‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ ; वाजपेयींचा लूक समोर
सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत असणारे अभिनेते अनुपम खेर यांनी राम अवतार भारद्वाज यांच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.

मुंबई : संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. या सिनेमात अभिनेता राम अवतार भारद्वाज हे अटलबिहारी वाजपेयींची भूमिका साकारताना दिसतील.
सिनेमात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या भूमिकेत असणारे अभिनेते अनुपम खेर यांनी राम अवतार भारद्वाज यांच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.
याबाबत ट्विट करत अनुपम खेर यांनी म्हटलं आहे, ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेत राम अवतार भारद्वाज यांना सादर करत आहोत.
मनमोहन सिंह यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारूंच्या ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकाने काही दिवसांपूर्वी देशात मोठा राजकीय भूकंप केला होता. पुस्तकाच्या नावावरूनही वाद निर्माण झाला. आता याच पुस्तकवर आधारित सिनेमा येत आहे. विजय रत्नाकर दिग्दर्शित हा सिनेमा यावर्षी 21 डिसेंबरला रिलीज होणार आहे.Introducing Shri. Ram Avatar Bhardawaj as former Prime Minister #AtalBihariVajpayeeji in the movie #TheAccidentalPrimeMinister.???????? @TAPMofficial pic.twitter.com/0vWJOCUCOb
— Anupam Kher (@AnupamPKher) June 21, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
