Rakul Preet Singh Jackky Bhagnani : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आज जॅकी भगनानीसोबत (Jackky Bhagnani) लग्नबंधनात अडकली आहे. गोव्यातील 'आयटीसी ग्रँड गोवा' या पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा लग्नसोहळा पार पडला आहे. या लग्नसोहळ्याला रकुल-जॅकीचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 


रकुल-जॅकीच्या लग्नाला गोव्यात सेलिब्रिटींची मांदियाळी


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांच्या लग्नसोहळ्याला शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, वरुण धवन, नताशा दलाल, आयुष्मान खुराना, अर्जुन कपूर, डेव्हिड धवन, महेश मांजरेकरसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. लग्नानंतर रकुल आणि जॅकी मुंबईत ग्रँड रिसेप्शनचं आयोजन करणार आहेत. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


रकुल-जॅकीचा शाही विवाहसोहळा


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी पंजाबी रितीरिवाजानुसार लग्नबंधनात अडकले आहेत. रकुल-जॅकीचा शाही विवाहसोहळा शुगर फ्री आणि ग्लूटन फ्री असणार आहेत. पाहुण्यांच्या तब्येती काळजी घेत त्यांनी शुगर फ्री आणि ग्लूटन फ्री मेन्यू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  मीडिया रिपोर्टनुसार, रकुल आणि जॅकी यांनी लग्नात तरुण तहिलयानी, शांतनु आणि निखिल, फाल्गुनी शेन पीकॉक, कुणाल रावल आणि अर्पिता मेहता या पाच डिझायनरने शेअर केलेले कपडे परिधान केले होते. 




'अशी' सुरू झाली रकुल प्रीत सिंह अन् जॅकी भगनानी यांची लव्हस्टोरी (Rakul Preet Singh Jackky Bhagnani Lovestory)


रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. रकुल आणि जॅकी गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे रिलेशनमध्ये येण्याआधी रकुल आणि जॅकी एकमेकांचे शेजारी होते. कोरोनाकाळात त्यांना एकमेकांबद्दल माहिती मिळाली. लॉकडाऊनमध्ये त्यांनी हँगआऊट करायला सुरुवात केली. त्यावेळी ते एकमेकांचे फक्त चांगले मित्र होते. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. 10 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांनी त्यांचं नातं जगजाहीर केलं. रकुलच्या वाढदिवशी जॅकीने खास रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. रकुल आणि जॅकीने त्यांचं नातं जगजाहीर केल्यापासून प्रेक्षक त्यांच्या लग्नाची प्रतीक्षा करत होते. जॅकी हा निर्माता आहे.


रकुल प्रीत सिंहचा सिनेप्रवास... (Rakul Preet Singh Movies)
 
रकुल प्रीत सिंहने हिंदीसह तामिळ आणि तेलुगू सिनेमांतदेखील आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. 'गिल्ली' या कन्नड सिनेमाच्या माध्यमातून तिने 2009 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर 'यारिया' या सिनेमाच्या माध्यमातून तिने 2014 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.


रकुल प्रीत सिंहने वेंकत्द्री एक्सप्रेस, लोकेम, किक 2, ध्रुवसह अनेक सिनेमांत आपल्या अभिनयाची झलक दाखलली आहेत. रकुल 2011 मध्ये फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सहभागी झाली होती. मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरची सुरुवात केली. आज ती बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.


संबंधित बातम्या


Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : 'या' आलिशान हॉटेलमध्ये रकूल प्रीत आणि जॅकी भगनानी लग्नाच्या बेडीत अडकणार; असं आहे नियोजन