Rakhi Sawant : देशभरात 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्याच्या (Dasara 2023) सण साजरा केला असून सर्वसामान्यांसह सेलिब्रिटींमध्येही या सणाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. दसऱ्यानिमित्त 'ड्रामाक्वीन' राखी सावंतने (Rakhi Sawant) 'रावण'लूक केला होता. धनुष्य, गदा आणि दहा तोंडे या तिच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर दुसरीकडे नेटकरी म्हणाले,"आज खऱ्या रुपात आली". 


'ड्रामाक्वीन' राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये दहा तोंडे घेऊन राखी सावंत चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. राखी सावंतचा हा लेटेस्ट व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.


राखी सावंतचा रावण लूक (Rakhi Sawant Ravan Look)


दसऱ्यानिमित्त राखी सावंतने रावण लूक केला होता. राखीने रावणाचा दहा तोंडे असलेला मुखवटा घातला आहे. तसेच तिच्या हातात धनुष्य आणि गदाही आहे. राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.






राखी सावंतला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल


राखी सावंतचा व्हिडीओ एकीकडे व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे नेटकरी मात्र तिला ट्रोल करत आहेत. व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लिहिलं आहे,"राखी आज तिच्या खऱ्या रुपात आली आहे", राखीचा लूक पाहून रावण आत्महत्या करेल, राखीला पाहून रावणही पळून जाईल". एकंदरीतच राखीचा रावण लूक पाहून नेटकऱ्यांनी तिची शाळा घेतली आहे. पण चाहत्यांना मात्र तिचा हा लूक आवडला आहे.


राखी सावंतबद्दल जाणून घ्या... (Who Is Rakhi Sawant)


बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतचं खरं नाव नीरू भेडा असं आहे. मुंबईत जन्मलेल्या राखीचं बालपण अत्यंत गरीबीत गेलं आहे. 'मोहब्बत है मिर्ची' या गाण्यामुळे राखी रातोरात सुपरस्टार झाली आहे. 'मस्ती' आणि 'मैं हूं ना' या सिनेमांतदेखील तिने काम केलं आहे. राखी सावंतने बिग बॉसदेखील गाजवलं आहे. तसेच 'राखी का स्वयंवर' हा कार्यक्रमही तिने केला होता. सोशल मीडियावरदेखील राखी चांगलीच अॅक्टिव्ह असते. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती कायम चर्चेत असते. 


संबंधित बातम्या


Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची राखी सावंतविरोधात तक्रार दाखल; नाना पाटेकरांवरही केली टीका