Rakhi Sawant Reaction On Chandrayaan 3 Launch : बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. बॉलिवूडसह राजकारणातील वेगवेगळ्या विषयांवर ती मत मांडत असते. त्यामुळे अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण तरीही ती चाहत्यांचं मनोरंजन करत असते. आता 'चांद्रयान -3' (Chandrayaan 3) यशस्वीरित्या अवकाशात झेपावलं आहे. दरम्यान 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने 'चांद्रयान - 3'च्या यशस्वी प्रक्षेपणावर प्रतिक्रिया दिली आहे. 


राखी सावंतने नुकतचं पापराझींना दिलेल्या मुलाखतीत 'चांद्रयान 3'च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्त्रोचे अभिनंदन केले आहेत. माझ्यामुळे 'Chandrayaan 3' अवकाशात झेपावलं, अशी प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे. तिच्या या प्रतिक्रियेने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 






राखी सांवतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेय या व्हिडीओमध्ये राखीने (Rakhi Sawant on Chandrayaan 3) पांढऱ्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तसेच त्यावर तिने खास दागिने आणि बांगड्या घातल्या आहेत. या व्हिडीओमध्ये 'ड्रामा क्वीन' म्हणत आहे,"आज मी पांढऱ्या रंगाच्या साडीत चांदणी बनले आहे. चांद्रयानासह मी स्वत:ला कसं लॉन्च केलं आहे ते पाहा. मी पांढऱ्या रंगाची साडी नेसल्यामुळे 'चांद्रयान 3'चं यशस्वी प्रक्षेपण झालं आहे". 


राखी पुढे म्हणाली,"चांद्रयान 3'च्या यशाबद्दल शास्त्रज्ञांचे आभार. मीदेखील एक वैज्ञानिक आहे. मी कसं स्वत:ला लॉन्च केलं ते तुम्ही पाहिलं का?". पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसमधून 'चांद्रयान 3' कसं पाहणार? त्यांच्याकडे दुर्बिण आहे का? मला वाटतं मुंबईतील रस्ते दुरुस्त केले तर बरे होईल. चंद्राप्रमाणे अनेक खड्डे इथेही आहेत". 


राखी सावंत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर 


राखी सावंतचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. 'ड्रामा क्वीन'लाही 'चांद्रयान - 3'वर बसून लॉन्च करायला हवं होतं, इस्त्रोला माझी विनंती आहे की,'चांद्रयान - 4'च्या वेळी राखीचा नक्की विचार करा, चंद्रावर राखीला तिच्या आवडीचा जोडीदार नक्की मिळेल, राखी आणि 'चांद्रयान 3'चा काहीही संबंध नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 


संबंधित बातम्या


Chandrayaan-3 : चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर कधी उतरणार? इस्रोच्या प्रमुखांनी सांगितली तारीख; कसा असेल चंद्रापर्यंतचा 40 दिवसांचा प्रवास?