Rakhi Sawant : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा वादात सापडली आहे. पूर्वाश्रमीचा पती आदिल खान दुर्रानीचा (Adil Khan Durrani) अश्लील व्हिडीओ लीक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता राखीने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. त्यांनी अटकपूर्व जामिनाची मागणी केली आहे. राखीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राखी सावंतच्या याचिकेवर येत्या सोमवारी 22 एप्रिल 2024 रोजी सुनावणी होणार आहे.


आदिल खान दुर्राणीचा आरोप काय आहे? 


राखी सावंतने आदिन खान दुर्रानीचे काही अश्लील व्हिडीओ लीक केले आहेत. त्यामुळे त्याने अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल केली होती. अटकेपासून बचाव करण्यासाठी राखीने अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राखीची ही याचिका फेटाळून लावली होती. आता सर्वोच्च न्यायालय तिच्या बाजूने निकाल देतं की नाही, हे 22 एप्रिलला स्पष्ट होईल.


एफआयआरमध्ये केलेल्या आरोपांनुसार, राखीने छोट्या पडद्यावरील एका टॉक शोमध्ये आदिल दुर्रानीचा व्हिडिओ दाखवला होता. इतकेच नाही तर राखीने त्या शोचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर शेअर केला आहे. यासोबतच शोची लिंक शेअर करून व्हिडिओही प्रसारित करण्यात आला.


राखी सावंत आणि आदिल खान दुर्रानी यांनी गुपचूप लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. राखीपासून विभक्त झाल्यानंतर आदिलने दुसरं लग्न केलं आहे. आदिलच्या पत्नीचं नाव सोमी खान असं आहे. आदिल आणि सोमीचा सुखी संसार सुरू आहे. तर दुसरीकडे राखी सध्या परदेशात आहे. राखी आणि आदिल विभक्त झाले असले तरी एकमेकांवर आरोप-पत्यारोप करताना दिसून येतात. 


नेमकं प्रकरण काय?


अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वी तिने विभक्त पती आदिल खान दुर्रानीचा एक खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. बदनामी करण्याच्या हेतूने राखीने व्हिडीओ शेअर केल्याचा दावा आदिलने केला होता. आदिल दुर्रानीने राखी सावंत विरोधात अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आदिलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी राखी सावंतवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अभिनेत्रीने अटकपूर्व जामिनासाठी दिंडोशी न्यायालयात धाव घेतली. आता अभिनेत्रीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 22 एप्रिलला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. 


संबंधित बातम्या


Rakhi Sawant Sameer Wankhede :  राखी सावंतच्या अडचणीत वाढ; समीर वानखेडेंकडून कोर्टात खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?