Amitabh Bachchan First Look From Kalki 2898 AD : दाक्षिणात्य सुपस्टार प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांचा 'कल्कि 2898 एडी' (Kalki 2898 AD) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चनदेखील (Amitabh Bachchan) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील बिग बींचा (Big B) लूक आता समोर आला आहे. त्यांच्या दमदार लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लूक आऊट झाल्यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


'कल्कि 2898 एडी' या चित्रपटाची नाग अश्विन यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांची भूमिका खास असणार आहे. निर्माते लवकरच याचा खुलासा करणार आहेत. 


'कल्कि 2898 एडी'मध्ये काय खास असणार? 


'कल्कि 2898 एडी'मधील अमिताभ बच्चन यांचा लूक आता समोर आला आहे. आता चित्रपटात ते कोणत्या भूमिकेत झळकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. समोर आलेल्या बिग बींच्या पोस्टरमध्ये ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत. 






'कल्कि 2898 AD' कधी रिलीज होणार? 


'कल्कि 2898 AD' या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबतच प्रभास आणि दीपिका पादुकोण हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच कमल हसन आणि दिशा पटानी हे कलाकार देखील  कल्कि 2898 AD या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहेत, असं म्हटलं जात आहे. तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटाचे आधी प्रोजेक्ट-के असे नाव होते. पण नंतर या चित्रपटाचे नाव बदलून कल्कि 2898 AD  असं ठेवण्यात आलं. या चित्रपटाला संतोष नारायणन यांनी संगीत दिले आहे, तर चित्रपटाची Cinematography  जोर्डजे स्टोजिल्जकोविक यांनी केले आहे. तसेच चित्रपटाचे एडिटिंग कोटागिरी वेंकटेश्वर राव यांनी केले आहे. 9 मे 2024 रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल. अमिताभ बच्चन यांच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे.


संबंधित बातम्या


Amitabh Bachchan: बिग बींच्या वाढदिवसाला चाहत्यांना मिळालं गिफ्ट; Kalki 2898 AD चित्रपटामधील अमिताभ बच्चन यांचा फर्स्ट लूक आऊट