एक्स्प्लोर
राखी सावंतचा 'एक्स' अभिषेक अवस्थी लग्नाच्या बोहल्यावर
गेल्या दोन वर्षांपासून अभिषेक आणि अंकिता गोस्वामी एकमेकांना डेट करत आहेत.
मुंबई : बॉलिवूडची ड्रामाक्वीन अशी ओळख असलेली अभिनेत्री राखी सावंतचा एक्स बॉयफ्रेण्ड बोहल्यावर चढणार आहे. राखीसोबत तीन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर विभक्त झालेला अभिनेता अभिषेक अवस्थी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहे.
अभिषेक अंकिता गोस्वामीसोबत पुढच्या महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन ही बातमी जाहीर केली आहे.
'चुकीच्या व्यक्तीसोबत काही काळ अडकल्यानंतर अखेर देवाने मला योग्य रस्ता दाखवला आहे. मला जशा मुलीशी लग्न करायचं होतं, अंकिता अगदी तशीच आहे.' असं अभिषेक म्हणाला होता.
अभिषेक अवस्थीचं नाव एका टॅलेंट शोमुळे ओळखीचं झालं. राखी सावंत आणि अभिषेक तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. 'नच बलिये 3' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दोघं रनर अप ठरले होते.
'राखी हा माझा लज्जास्पद भूतकाळ आहे. तिच्याबरोबर वेळ घालवल्याचा मला पश्चाताप होतो. ती माझी सर्वात मोठी चूक आहे.' असं अभिषेक काही वर्षांपूर्वी म्हणाला होता. अंकितासोबत एंगेजमेंट होण्यापूर्वीही त्याचा एकदा साखरपुडा मोडला होता.
अभिषेक सब टीव्हीवरील 'खिडकी' या कार्यक्रमात दिसला होता. लाईफ ओके वाहिनीवरील 'चंद्रकांता- प्रेम या पहेली' या मालिकेत तो झळकणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement