क्रिश मालिकेतील क्रिश 4 हा सिनेमा 2020 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज होणार असल्याची माहिती स्वत: राकेश रोशन यांनी ट्विटरवरुन दिली.
माझ्या आयुष्यात तू सूर्यकिरणांसारखा, बर्थ डेनिमित्त हृतिकला सुझानच्या शुभेच्छा!
"क्रिश 4 च्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. ख्रिसमस 2020 चित्रपट रिलीज होणार. हृतिकच्या वाढदिवशी सगळ्यांसाठी खास गिफ्ट. हॅप्पी बर्थ डे हृतिक," असं ट्वीट राकेश रोशन यांनी केलं आहे.
हृतिकचे क्रिश मालिकेतील यापूर्वीचे तिन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते.
दरम्यान, हृतिक सध्या 'सुपर 30' ह्या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. 'सुपर 30' चित्रपट आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे.