Rajshri Deshpande : राजश्री देशपांडे (Rajshri Deshpande) मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या सीरिजनंतर प्रेक्षकांचा अभिनेत्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन पूर्णपणे बददला. आता 'आरपार' या  युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राजश्री देशपांडे म्हणाली,"फक्त बोल्ड सीन (Bold Scenes) दाखवणं हा आळशीपणा आहे. इंटिमेट सीन (Intimate Scene) टाकावेच लागतात, असं म्हणणारी लोक आळखी असतात". अभिनेत्रीच्या या वक्तव्याने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. राजश्री देशपांडेचे अनेक चित्रपट आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता अभिनेत्रीच्या आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.


मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) 'आरपार'च्या मुलाखतीदरम्यान राधिका देशपांडेला विचारते,"वेबसीरिजमध्ये इंटिमेट सीन्स दाखवावेच लागतात, असं सध्या चित्र आहे. पण सेन्सॉरशिप नसल्यामुळे या गोष्टी असल्याच पाहिजेत असं आता चित्र आहे. त्यामुळे ओटीटीवरचा बराचसा कंटेट आपण घरात बसून तीन पिढ्यांबरोबर एकत्र नाही बघू शकत". याचं उत्तर देत राजश्री देशपांडे म्हणली,"खरं तर असं नाही आहे. मला वाटतं की, हे टाकावच लागतं हे जे करणारे लोक आहेत ते आळशी आहेत. एखाद्या संहितेबद्दल बघितलं तर त्याची काय गरज आहे? का ते आहे? त्याचा काय उद्देश आहे? ते जर असेल तर त्याचं समर्थन करायला हवं का?. पण तुम्ही ते sensationalization करण्यासाठी टाकताय. तुम्ही ते क्रॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यासाठी टाकताय, तुम्हाला असं वाटतं की हे चालतं म्हणून टाकताय, मग ती लोक काम करत नाही. ते लोक शॉर्टकट पाहतात". 






फॅशन आणि ग्लॅमर नाही तर व्यक्तिमत्त्व


राजश्री म्हणते,"तब्बूचा (Tabu) चित्रपट हिट होताना मला खूप आनंद होतो. शेफाली शहाची (Shefali Shah) फिल्म हिट होतो तेव्हाही मला खूप आनंद होतो. विद्याचा (Vidya Balan) चित्रपट हिट होताना मला असं वाटतं की Wow, की ती दाखवत नाही की माझं पोट सपाट आहे म्हणून. ती दाखवते तिचे Curves आणि त्याच्यामध्ये ती मॅजिक क्रिएट करते. ते जास्तीत जास्त हिट व्हायला पाहिजे. म्हणजे लोकांना कळेल की बायका म्हणजे एक मुलगी म्हणून म्हणजे असं नाही आहे की ती फक्त उंचच असायला हवी, तिचे केस नेहमी चांगले असायला पाहिजे, तिचा चेहरा एकदम असा खूप गुळगुळीत असा असायला हवा. तर नाही ती पात्र (Character) असायला पाहिजे. एक आयुष्य दाखवायला पाहिजे. 


छोट्या गावात आणि तांड्याच्या भागात अजुन खूप काम बाकी आहे : राजश्री देशपांडे


राजश्री देशपांडे अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होत असते. याबद्दल बोलताना राजश्री म्हणते,"माझे बरेच नातेवाईक गावात राहतात. त्यांना भेटल्यानंतर मला असं जाणवलं की अरे खूप काम बाकी आहे. छोटी-छोटी गावं आहेत. वेगवेगळ्या तांड्याचा भाग आहे. तिथे काहीच काम नाही आहे. तर मी असं वाचन, काम सगळं त्यांच्यामधून मी ते मी स्वत:ला पुढे नेलं. पुढे मी लोकांना यात सहभागी करुन घेतलं. यात काम करणाऱ्या लोकांनी मला मार्गदर्शन केलं. लोकांना एकत्र आणण्यापासून सुरुवात केली, पाण्यावर काम केलं". 


संबंधित बातम्या


South Bold Actress : समंथा, तमन्ना ते कियारा आडवाणीपर्यंत! 'या' 5 वेबसीरिजमध्ये अभिनेत्रींनी सर्व मर्यादा ओलांडल्या!