Patralekhaa Wedding Saree : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekha) लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. दोघांचा शाही विवाहसोहळा चंदीगढमध्ये पार पडला. अलीकडेच त्यांच्या साखरपुड्याचा व्हिडीओदेखील समोर आला होता. त्या व्हिडीओमध्ये राजकुमार सर्वांसमोर पत्रलेखाला गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज करताना दिसून आलेला. आता राजकुमारने सोशल मीडियावर पत्रलेखासोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत लक्षवेधी ठरत आहे ती पत्रलेखाची ओढणी.





राजकुमारची नववधू अर्थात पत्रलेखा लाल रंगाच्या पेहरावात जितकी सुंदर दिसत आहे तितकाच राजकुमारदेखील लग्नाच्या फोटोंमध्ये हॅंडसम दिसत आहे. पत्रलेखाच्या ओढणीच्या बॉर्डरवर एक खास संदेश लिहिला आहे. हा संदेश बंगाली भाषेत लिहिलेला आहे. या संदेशात लिहिले आहे, "माझं प्रेमाने भरलेलं हृदय आता तुला समर्पित करत आहे". 


इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत राजकुमारने लिहिले,"अखेर 11 वर्षांच्या मैत्री, प्रेमानंतर मी माझ्या जोडीदाराशी लग्न केले आहे. तुझा पती असल्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे". 


राजकुमार राव आणि पत्रलेखाची प्रेमकहाणी खूप खास आहे. पत्रलेखाला राजकुमारने एका जाहिरातीत पाहिले होते. त्यानंतर दोघे एका सिनेमादरम्यान भेटले. दरम्यान दोघांची मैत्री झाली. पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. राजकुमार आणि पत्रलेखा 2010 पासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


Rajkumar Rao आणि Patralekha आज अडकले लग्नाच्या बेडीत, चंदीगढमध्ये पार पडला विवाहसोहळा


Rajkummar Rao Wedding Card : शादी में जरूर आना... राजकुमार आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, चंदीगडमध्ये बांधणार लग्नगाठ


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha