Rajkummar Rao-Patralekhaa Marriage: बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) आज विवाहबंधनात अडकले आहेत. पत्रलेखाने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शन लिहिली आहे,"मी आज लग्न केले आहे. माझा प्रियकर, सखा, माझ्या कुटुंबातीलच एक सदस्य...मागील अकरा वर्षांतील माझ्या सगळ्यात जवळचा मित्र. तुझी पत्नी होण्याचे भाग्य मला लाभले आहे."






राजकुमार रावने लग्नातले फोटो शेअर करत लिहिले आहे, 11 वर्षांचे प्रेम, मैत्री, मजा-मस्ती, माझ्या सर्वस्वसोबत आज मी लग्न केले आहे. पत्रलेखा आज तु मला तुझा नवरा म्हणशील, याचा मला खूप आनंद आहे.





चंदीगढमध्ये दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. 2010 पासून एकत्र असलेल्या राजकुमार आणि पत्रलेखाने चंदीगढमधील ओबोरॉय सुखविलास रिसॉर्टमध्ये लग्नसोहळा पार पडला. फराह खान आणि अभिनेता साकिब सलीम व्यतिरिक्त दोघांच्या खास मित्रांनी लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. 


संबंधित बातम्या


Rajkummar Rao Wedding Card : शादी में जरूर आना... राजकुमार आणि पत्रलेखाची लग्नपत्रिका व्हायरल, चंदीगडमध्ये बांधणार लग्नगाठ


राजकुमार- पत्रलेखाची 'लगीनघाई', आज चंदीगडमध्ये सनई चौघडे


Antim Film : सलमान खानने 'राहुलिया' म्हणत आयुष शर्माचा बीटीएस व्हिडीओ केला शेअर


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha