Antim Film : सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माच्या (Aayush Sharma) 'अंतिम-द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमाची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. हा सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याने सिनेमाच्या संबंधित अनेक गोष्टी समोर येत आहेत. या सिनेमात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भूमिकेसाठी आयुष शर्माने अथक मेहनत घेतली होती. त्यासंदर्भातच सलमान खानने आयुष शर्मानं भूमिकेसाठी कसे परिवर्तन केले त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
अंतिम सिनेमातील भूमिकेविषयी आयुष शर्मा म्हणाला,"अंतिम सिनेमाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. एक अभिनेता म्हणून या सिनेमाद्वारे अनेक गोष्टी शिकता आल्या. सिनेमाच्या सुरुवातील राहुलियाला कसं साकार करु याचा अंदाज येत नव्हता. तर शूटिंग संपल्यानंतर राहुलियापासून दूर जाणं बघवत नव्हतं".
महेश मांजरेकरांनी अंतिम सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. राहुलियाच्या पात्राविषयी महेश मांजरेकर म्हणाले,"आयुषने भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. हे पात्र साकारण्यासाठी दणकट माणसाच्या शोधात होतो. आयुषने या भूमिकेसाठी जबरदस्त मेहनत घेतली आहे. राहुलियाची भूमिका इंडस्ट्रीतील इतर कोणी अशापद्धतीने साकारू शकलं असतं असं वाटत नाही".
सलमान खानचा अंतिम सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. राजवीर सिंह असे त्या पोलिसाचे नाव आहे. तर सिनेमात आयुष शर्मा एका गुंडाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 'भाई का बर्थडे', 'होने लगा' आणि 'चिंगारी' अशी सिनेमातील तीन गाणी प्रदर्शित झाली आहेत.
संबंधित बातम्या
Gangubai Kathiawadi Release Date : Alia Bhatt चा' गंगूबाई काठियावाडी' आता 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'हिंदुस्थान का शेर आ रहा है'; पृथ्वीराजचा टीझर प्रदर्शित, अक्षय कुमारचा रॉयल लूक चर्चेत
आता अजय देवगणच्या 'सिंघम 3' ची प्रतिक्षा, Rohit Shetty पुढच्या वर्षी चित्रिकरणाला सुरुवात करणार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha