Rajkummar Rao and Patralekhaa : अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) 11 वर्षांच्या मैत्रीनंतर लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नसोहळ्याचे अनेक फोटो त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते. आता पत्रलेखाची धाकटी बहीण परनालेखाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एका पार्टीतले फोटो शेअर केले आहेत. 


फोटोमध्ये परनालेखा तिचा भाऊ अग्निश पॉल, राज कुमार राव आणि पत्रलेखासोबत पोज देताना दिसत आहे. फोटोत चौघेही मस्ती करताना दिसत आहेत. चौघेही ग्लॅमरस अंदाजात दिसत आहेत. फोटो शेअर करत तिने कॅप्शन लिहिले आहे,"महान ऑड्रे हेपबर्नने एकदा सांगितले होते, आयुष्य हे एखाद्या पार्टी वेअर ड्रेससारखे आहे".






राजकुमार राव आणि पत्रलेखाचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. चाहते कमेंट्स करत दोघांचे कौतुक करत आहेत. नुकतेच राजकुमारने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले होते. त्या फोटोंमध्ये दोघेही खूप खूश दिसत होते. फोटो शेअर करत त्याने लिहिले होते,इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत राजकुमारने लिहिले,"अखेर 11 वर्षांच्या मैत्री, प्रेमानंतर मी माझ्या जोडीदाराशी लग्न केले आहे. तुझा पती असल्याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे". 


राजकुमार रावचे अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. राजकुमार लवकरच हंसल मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या 'स्वागत' सिनेमात दिसणार आहे. तसेच हर्षवर्धन कुलकर्णींच्या आगामी 'बधाई दो' सिनेमातदेखील भूमी पेडनेकरसोबत दिसणार आहे. 'हिट', 'सेकंड इंनिंग्स', 'लाइफ इन अ मेट्रो सीक्वल' आणि 'भीड' हे राजकुमारचे आगामी सिनेमे आहेत. 


संबंधित बातम्या


Patralekhaa Wedding Saree : Patralekha च्या साडीवर बंगाली भाषेत लिहिला होता 'हा' संदेश, Rajkummar Rao ने केले पत्रलेखाचे कौतुक


सलमान खानचा 'Antim' आणि जॉन अब्राहमचा 'Satyameva Jayate 2' आमने-सामने; पुढच्या आठवड्यात होणार प्रदर्शित


'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा', आता कानाकोपऱ्यात दुमदुमणार 'Indian Idol Marathi'चा आवाज, अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha