एक्स्प्लोर

म्हणून गेली 27 वर्ष रजनीकांत बर्थडेला घरी नसतो...

गेली तीनच वर्ष नाही, तर सुमारे 27 वर्ष थलैवा चाहत्यांकडून होणारं सेलिब्रेशन टाळण्यासाठी आपल्या वाढदिवशी शहराबाहेर किंवा देशाबाहेर राहणं पसंत करत आहे.

मुंबई : 12 डिसेंबर म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा वाढदिवस. थलैवाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी चाहते पुढाकार घेत असले, तरी गेल्या तीन वर्षांपासून रजनीकांत विविध कारणं देत सेलिब्रेशन टाळत आल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या तीन दशकांपासून रजनीने आपल्या वाढदिवशी घरी किंबहुना शहरात किंवा देशातच राहणं टाळलं आहे, आणि त्याचं कारण हृदयाला चटका लावणारं आहे. 2015 मध्ये चेन्नईतील पूरामुळे रजनीकांतने चाहत्यांना आपला वाढदिवस साजरा न करण्याचं आवाहन केलं, तर 2016 मध्ये मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे रजनीने वाढदिवस सेलिब्रेट न करण्यास चाहत्यांना सांगितलं. यावर्षीही ओखी चक्रीवादळामुळे बसलेला फटका लक्षात घेत, त्याने बर्थडे सेलिब्रेशन टाळलं. मात्र गेली तीनच वर्ष नाही, तर 27 वर्ष थलैवा चाहत्यांकडून होणारं सेलिब्रेशन टाळण्यासाठी आपल्या वाढदिवशी शहराबाहेर किंवा देशाबाहेर राहणं पसंत करत आहे. पाच वर्षांपूर्वी म्हणजे 12-12-12 (12 डिसेंबर 2012) रोजी रजनीकांतने चेन्नईत आपल्या हार्डकोअर चाहत्यांना याचं कारण सांगितल्याचं 'द इंडियन एक्स्प्रेस'ने दिलं आहे. 'मी नेहमीच माझ्या बर्थडेला शहरात असायचो. सुमारे 22 वर्षांपूर्वी माझ्या वाढदिवसाला माझे तीन चाहते मला भेटून घरी परतत होते. त्यावेळी कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दुःखात बुडालेल्या त्या तिघांच्या पालकांनी मला एक प्रश्न विचारला. त्याचं उत्तर मला देता आलं नाही. मला तो प्रश्न कोणालाच सांगायचा नाही. पण त्या दिवसानंतर वाढदिवासाला आपल्या घरी न थांबण्याचं मी ठरवलं' असं रहस्य त्याने उलगडलं होतं. 'माझ्या या निर्णयानंतर मी परगावी जायला लागलो. आतापर्यंत आयुष्यात काय काय केलं, याबाबत आत्मपरीक्षण करतो. सध्या मी काय करतोय आणि भविष्यात काय करायला आवडेल, याचा विचार करतो.' असं रजनीकांतने सांगितलं होतं. 27 एप्रिल 2018 रोजी रजनीकांतची भूमिका असलेला 2.0 हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रंजितचं दिग्दर्शन असलेल्या 'काला' चित्रपटाची रीलिजींग डेट अद्याप निश्चित झालेली नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 : तू, मी अन् 'देऊळ बंद 2'.. प्रवीण तरडेंच्या पत्नीची इमोशनल पोस्ट, सेटवरील UNSEEN Photos शेअर
तू, मी अन् 'देऊळ बंद 2'.. प्रवीण तरडेंच्या पत्नीची इमोशनल पोस्ट, सेटवरील UNSEEN Photos शेअर
Karan Johar: करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
करण जोहरला नेमकं काय खटकलं? शाहरुख खान, आलिया भट्ट, करिनाला का अनफॉलो केलं? म्हणाला...
Raja Shivaji: रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
रिलीज होऊन महिना उलटला, तरीही 'राजा शिवाजी'चं वादळ शमेना; 28 व्या दिवशीही दमदार कमाई
Pankaj Bhadouria: भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन
भारताच्या प्रसिद्ध शेफला स्तनाचा कर्करोग, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल, चाहत्यांना केलं आवाहन

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Embed widget