भारतातील महागडा सिनेमा '2.0' चा ट्रेलर लॉन्च
बॉलिवूडचा खिला़डी अक्षय कुमार '2.0' सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा सिनेमातील लूकही समोर आला आहे. रजनीकांत पुन्हा एकदा वैज्ञानिकाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे.

मुंबई : भारतातील सर्वांत महागड्या ‘2.0’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटात दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका आहे. ‘2.0’ हा चित्रपट भारतातील सर्वांत महागडा आणि आशिया खंडातील सर्वाधिक बजेटचा दुसरा चित्रपट आहे.
काही दिवसांपूर्वी लॉन्च करण्यात आलेला सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. सिनेमाचा टीझर पाहिल्यानंतर सिनेमाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. त्यानंतर आज ट्रेलर पाहून प्रेक्षकांनी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
व्हीएफएक्सच्या खर्चामुळे सिनेमा आधीपासूनच चर्चेत होता. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर रजनीकांतच्या 'रोबोट' सिनेमाची आठवण होते. '2.0'मध्ये 'रोबोट'सिनेमातील 'चिट्टी'चे अॅक्शन सीन पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
बॉलिवूडचा खिला़डी अक्षय कुमार '2.0' सिनेमात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. अक्षयचा सिनेमातील लूकही समोर आला आहे. रजनीकांत पुन्हा एकदा वैज्ञानिकाच्या भूमिकेत या सिनेमात दिसणार आहे.
एस. शंकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलं असून भारतातील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. सिनेमातील व्हीएफएक्सवर 75 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 544 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















