एक्स्प्लोर

राज ठाकरेंच्या मुलाला अमिताभ यांचं मौल्यवान रिटर्न गिफ्ट!

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे सध्या भलत्याच खुशीत आहेत. या आनंदामागचं कारणही मोठं आहे. कारण बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून अमित ठाकरेंना चक्क त्यांचं लकी घड्याळ दिलं. राज ठाकरे यांनी उशिराच म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी अमिताभ बच्चन यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट दिलं. हे गिफ्ट म्हणजे राज ठाकरे यांनी स्वत: रेखाटलेलं बिग बी याचं स्केच. हे स्केच अमित ठाकरे यांनीच अमिताभ यांना 'जलसा' बंगल्यावर जाऊन दिलं. इतकंच नाही तर आवडत्या अभिनेत्यासोबत दोन तास बोलण्याची संधीही त्यांना मिळाली. 11 ऑक्टोबर रोजी अमिताभ यांचा वाढदिवस होता. मात्र अमित ठाकरेंना सुखद धक्का तर दुसऱ्या दिवशी बसला. कारण महानायकाने चक्क त्यांचं लकी मनगटी घड्याळ अमित यांना रिटर्न गिफ्ट म्हणून दिलं होतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ अमिताभ काही वर्षांपासून वापरत आहेत. अनेक कार्यक्रमातही अमिताभ यांच्या मनगटावर हे घड्याळ दिसतं. फ्लोरोसंट ग्रीन रंगाचं हे घड्याळ बच्चन यांचं स्टाईल स्टेटमेंट बनलं होतं. Amitabh_Bachchan_Watch खुद्द बिग बी यांच्याकडून घड्याळ गिफ्ट मिळल्यापासून अमित ठाकरेंनी ते हातातून काढलं नसल्याचं त्यांच्या मित्रांनी सांगितलं. अमिताभ यांना स्केच भेट देण्यासाठी अमित यांच्यासोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही 'जलसा' बंगल्यावर गेले होते. या भेटीविषयी बोलताना खोपकर म्हणाले की, "अमिताभ बच्चन यांच्यासोबत आम्ही सुमारे दोन तास घालवले. राज ठाकरे यांनी स्वत: अमिताभ यांचं चित्र रेखाटलं आहे. बिग बींनी आम्हाला त्यांचं वाचनालय दाखवलं. राज ठाकरेंनी रेखाटलेल्या चित्रांचा आणि व्यंगचित्रांचा त्यांच्याकडे खजिनाच होता, हे पाहून आम्हाला धक्का बसला." "अमिताभ बच्चन यांना घड्याळांचं कलेक्शन करण्याचा छंद असल्याचं अमितने वाचलं होतं. शिवाय त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून दिलेलं घड्याळ बिग बी यांनी लंडनमधून खूप वर्षांपूर्वी खरेदी केलं होतं. मात्र राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज' बंगल्यावर अमिताभ यांच्याकडून रिटर्न गिफ्ट म्हणून आलेलं घड्याळ पाहून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो," असंही खोपर यांनी सांगितलं 'मार्मिक'मध्ये राज याचं व्यंगचित्र छापून येत असल्यापासून त्यांना फॉलो करत असल्याचं अमिताभ बच्चन यांनी भेटीदरम्यान अमित ठाकरेंना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Nana Patekar Death News: पुण्याच्या डोणजेत नाना पाटेकरांवर अंत्यसंस्कार, अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
Janai Bhosle On Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
नाना पाटेकरांच्या निधनानंतर आशा भोसलेंची नात हळहळली; भावूक होऊन म्हणाली... VIDEO
Nana Patekar Death Marathi News Medha Majrekar Post: 'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
'नाना मला 'सरकार' म्हणायचे... तुम्ही सदैव 'नटसम्राट'च राहाल...'; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मेधा मांजरेकर गहिवरल्या, नेमकं काय म्हणाल्या?
Nana Patekar Son Malhar: नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन
नानांचा मुलगा मल्हार पाटेकर नेमकं काय करतो?; लाइमलाइटपासून दूर, पण सिनेसृष्टीशी खास कनेक्शन

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Embed widget