Raha Kapoor Viral Video : बॉलिवूड (Bollywood Actor) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि बॉलिवूडची राधा आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची लाडकी लेक राहा (Raha Kapoor) नुकतीच एक वर्षाची झाली आहे. रणबीर आणि आलियाची लेक सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. कधी ती आलियाच्या कडेवर दिसते, तर कधी रणबीरचा हात पकडून सगळ्यांकडे पाहत शांतपणे तिथून निघून जाते. पण तिच, राहा खूप खट्याळ आहे, याची प्रचिती चाहत्यांना सध्या व्हायरल होणाऱ्या सोशल मीडियावरच्या फोटोंवरुन येत आहे. सध्या रणवीर, आलिया आणि त्यांच्या लेकीचे फुटबॉल मॅच दरम्यानचे फोटो व्हायरल होत आहेत. 


आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, रणबीर कपूर फुटबॉलचा खूप मोठा चाहता आहे. मध्यतंरी रणबीरच्या घराचे काही फोटो सोशल मीडीयावर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्याच्या घराच्या प्रत्येक भिंतीवर फुटबॉलची ओळख पाहायला मिळाली होती. एवढंच काय तर, रणबीरचा स्वतःचा एक फुटबॉल क्लबही आहे. तो स्वतःही उत्तम फुटबॉल प्लेयर आहे. नुकतीच त्याच्या क्लबची फुटबॉल मॅच झाली. त्यावेळी तो बायको आलिया आणि लेक राहासोबत फुटबॉल ग्राउंडवर दिसला होता. सर्वांच्या नजरा रणबीर, आलिया सोडून राहावर खिळल्या होत्या. आपल्या इवल्या इवल्या पावलांनी मैदानात दुडूदुडू धावणारी राहा सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत होती. 






30 नोव्हेंबर 2024 रोजी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट त्यांची मुलगी राहा कपूरसोबत मुंबईत फुटबॉल सामना पाहण्यासाठी गेले होते. एका व्हिडीओमध्ये तिघेही स्टेडियममध्ये फिरताना दिसत आहेत. आलियानं आपल्या लाडक्या चिमुरडीला आपल्या मांडीवर घेतलं आहे.  दोघींच्या बाजूलाच रणबीर बसला असून तिघेही आपल्या टीमला चिअर करताना दिसले. त्यावेळी राहाच्या निरागसतेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 








राहाच्या जर्सीवरच्या नंबरच्या चर्चा 


रणबीर आणि राहा यांनी मॅचिंग ब्लू जर्सी घातली होती, तर आलियानं स्वत:ला पांढरा टँक टॉप, काळा शर्ट आणि ग्रे पँट घातली होती. राहाच्या हातात फुगा होता. सामना सुरू असतानाच इतरांप्रेमाणेच राहाही अगदी वेगवेगळे एक्सप्रेशन्स देत सामना पाहत होती. राहाच्या जर्सीच्या मागील बाजूस 6 नंबर लिहिलेला होता आणि त्यावर तिचं नावंही लिहिलं होतं. तिच्या जर्सीवर सहा नंबर लिहिलेला कारण तिची बर्थडेट 6 आहे.