Sharad Kapoor Accused Of Harassment Case: सध्या बॉलिवूडमधून (Bollywood) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बॉलिवूडच्या (Bollywood Actor) बड्या अभिनेत्यावर एका 32 वर्षीय महिलेनं लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तसेच, याप्रकरणी अभिनेत्यावर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. जोश चित्रपट अभिनेता शरद कपूर (Sharad Kapoor) याच्यावर महिलेनं आरोप केल्याची माहिती मिळत आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार, महिलेनं अभिनेत्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेचं म्हणणं आहे की, अभिनेत्यानं तिला प्रोफेशनल कामासाठी घरी बोलावलं होतं. ठरल्यानुसार, महिला शरदच्या घरी पोहोचली. पण तिथे पोहोचल्यानंतर मात्र, तो तिच्याशी गैरवर्तन करू लागला आणि तिला जबरदस्तीनं स्पर्श करू लागला. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेनं फेसबुकच्या माध्यमातून अभिनेत्याशी संपर्क साधला होता. चॅट आणि ऑडीओ कॉलवर बोलल्यानंतर दोघांनीही व्हिडीओ कॉलवर बोलले होते.
शरद कपूरवर आरोप करणाऱ्या महिलेनं सांगितलं की, मी त्याच्याशी बोलले, त्याला सांगितलं की, मला एका चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात तुम्हाला भेटायचं आहे. शरदनं तिच्यासोबत लोकेशन शेअर केलं आणि तिला त्याच्या ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांगितलं, पण जेव्हा ती महिला ऑफिसमध्ये पोहोचली, तेव्हा तिला कळलं की, तिथे त्याचं ऑफिस नसून त्याचं घर आहे. ती तिसऱ्या मजल्यावर त्याच्या घरी गेली. दोघांमध्ये थोडंसं बोलणं झालं, त्यानंतर शरदनं तिला बेडरूममध्ये येण्यासाठी खुणावलं.
त्यानंतर महिला थेट आपल्या घरी निघून गेली. त्यानंतर शरदनं तिला व्हॉट्स अॅपवर मेसेज करायला सुरुवात केली. मेसेजमधून तिच्यासाठी अपशब्द वापरले. त्यानंतर महिलेनं ही संपूर्ण घटना आपल्या मित्राला सांगितली. त्यानंतर महिलेनं थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि शरद कपूर विरोधात एफआयआर दाखल केला. अभिनेत्याविरोधात कलम 74, 75, 79 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास करत आहेत, मात्र या प्रकरणी अद्याप अभिनेत्याचं कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :