एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
ऐन वीकेंडला 'रईस'च्या कमाईचा वेग मंदावला!
![ऐन वीकेंडला 'रईस'च्या कमाईचा वेग मंदावला! Raees Box Office Collection Still Saturday ऐन वीकेंडला 'रईस'च्या कमाईचा वेग मंदावला!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/29155441/Raees2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बॉक्स ऑफिसवर दोन तगड्या सुपरस्टारची टक्कर पाहायला मिळत आहे. किंग खान शाहरुखचा ‘रईस’ आणि हृतिक रोशनचा ‘काबिल’ हे दोन चित्रपट भिडत आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवरील कमाई पाहता ‘रईस’च रईस ठरत आहे. राहुल ढोलकियाचं दिग्दर्शन असलेला हा रईस क्राईम थ्रिलर आहे.
शाहरुख खान, नवाझुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या रईसने चार दिवसात मिळून 75.44 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपट ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
'रईस'ची कमाई :
बुधवारी - 20.42 कोटी
गुरुवार - 26.30 कोटी
शुक्रवार - 13.11 कोटी
शनिवार - 15.61 कोटी
एकूण - 75.44 कोटी
यामी गौतम आणि हृतिक रोशन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘काबिल’ सिनेमाच्या तीन दिवसांच्या कमाईची आकडेवारी हाती आली आहे. संजय गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला आणि राकेश रोशन यांची निर्मिती असलेला ‘काबिल’ सूडपटाचा प्रवास मांडतो.
'काबिल'ची कमाई :
बुधवारी - 10.43 कोटी
गुरुवार - 18.67 कोटी
शुक्रवार - 9.77 कोटी
एकूण - 38.87 कोटी
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion