Bollywood Actress : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली राशी खन्ना (Raashii Khanna) बॉलिवूडमध्येही चांगलीच सक्रीय आहे. राशी खन्ना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. राशीने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर राशीने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. अभिनेत्रीने नुकतचं हैदराबादमध्ये एक आलिशान घर विकत घेतलं आहे. राशीने नुकताच तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. गृहप्रवेशादरम्यानचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले होते. पण खरं तर आज बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या राशी खन्नाला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. आयएएस अधिकारी (IAS Officer) होण्याचं तिचं स्वप्न होतं. 


अभ्यासात हुशार असलेली राशी खन्ना


राशीच्या अभिनयाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की राशी अभ्यासातदेखील हुशार आहे. राशी खन्नाला शिक्षणाची प्रचंड आवड होती. राशीने 12 वीमध्ये असताना टॉप केलं होतं. राशी अभ्यासात हुशार असल्याने IAS अधिकारी होण्याची तिची इच्छा होती. पण काही कारणाने तिला IAS अधिकारी होता आलं नाही आणि ती अभिनेत्री झाली. 


'या' चित्रपटाच्या माध्यमातून केलेली बॉलिवूडमध्ये एन्ट्री!


राशी खन्नाने जॉन अब्राहमच्या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. 'मद्रात कॅफे' चित्रपटात त्याने एक छोटी भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने तामिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांत काम केलं. मल्याळम इंडस्ट्रीमध्ये राशीने 'विलन' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर अभिनेत्रीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. राशी खन्ना सिद्धार्थ मल्होत्रासोबत 'योद्धा' या चित्रपटात झळकणार आहे. योद्धामध्ये राशी खन्नासोबत दिशा पटानीदेखील दिसून आली होती. सिद्धार्थ आणि राशीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. राशीची रुद्र ही वेबसीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या सीरिजमध्ये अभिनेत्री अजय देवगनसोबत दिसली होती. 


गरीबांच्या मदतीसाठी राशी खन्ना एक पाऊल पुढे


राशी खन्ना दरवर्षी आपल्या वाढदिवशी गरीब मुलांच्या मदतीसाठी पुढे असते. गरजू लोकांसोबत वाढदिवस साजरा करायला तिला आवडतं. राशी खन्ना फिटनेस फ्रीक आहे. वर्कआऊट आणि डाएट प्लॅन फॉलो करताना ती दिसून येते. राखी खन्ना अभिनेत्री असण्यासोबत उत्कृष्ट नृत्यांगनादेखील आहे. 'अंडम डिंडोलम' (सुप्रीम),ऊ बावा (प्रती रोजु पंडागे), अल्लासानी वारी (थोमी प्रेमा), आसिया खंडामलो (बंगाल टायगर) सारख्या गाण्यांमध्ये राशीने आपल्या नृत्याचा जलवा दाखवला आहे.  राशी खन्ना आणि बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.


संबंधित बातम्या


South Bold Actress : समंथा, तमन्ना ते कियारा आडवाणीपर्यंत! 'या' 5 वेबसीरिजमध्ये अभिनेत्रींनी सर्व मर्यादा ओलांडल्या!