TV Actress Reveals Sexual Harassment : मनोरंजनसृष्टीतील अनेक अभिनेत्रींसह (Actress) अभिनेतेदेखील (Actors) कास्टिंग काऊचचा (Sexual Harassment) शिकार झाले आहेत. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर (Sonal Vengurlekar) कास्टिंग काऊचचा शिकार झाली होती. अभिनेत्रीने नुकताच याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीच्या वक्तव्याने चाहत्यांसह नेटकरी हैराण झाले आहेत. कपडे काढून मंत्रोच्चार कर, रातोरात स्टार होशील, असं कास्टिंग दिग्दर्शक अभिनेत्रीला म्हणाला होता. तसेच त्याने तिला कपडे बदलण्याआधी ब्रेस्टवर काहीतरी क्रिम लावण्यास सांगितली होती. कास्टिंग काऊचचा शिकार झाली तेव्हा सोनलचं वय फक्त 19 वर्षे होतं. सोनल आज छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण करिअरच्या सुरुवातीला तिला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे.
सोनल वेंगुर्लेकर टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. लहान वयात तिने आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. सोनलने आतापर्यंत 'वादा रहा','ये तेरी गलियां','साम दाम दंड भेद,'गुप्ता ब्रदर्स','शास्त्री सिस्टर्स' सारख्या लोकप्रिय मालिकांध्ये काम केलं आहे. पण सोनलला आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव खूपच भयानक आहे.
सोनलने शेअर केला कास्टिंग काऊचचा अंगावर शहारे आणणारा अनुभव
मी टू मोहिमेदरम्यान सोनल म्हणाली होती,"मी 19 वर्षांची असताना चांगल काम शोधत होते. त्यावेळी इंडस्ट्रीतील लोकप्रिय कास्टिंग दिग्दर्शक आणि फोटोग्राफर राजा बजाज यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केलं. 2018 मध्ये मला राजा बजाज यांच्या ऑफिसमधून ऑडिशनसाठी फोन आला होता. त्यामुळे मी खूप आनंदी होते. राजा एक लोकप्रिय फोटोग्राफर आणि कास्टिंग दिग्दर्शक होते. पहिलं ऑडिशन असल्याने डायलॉग म्हणताना मी अडखळत होते. त्यामुळे राजा यांनी मला त्यांच्या आगामी शूटिंगदरम्यान बोलावलं. जेणेकरून सेटवरील मंडळींकडून मला काही शिकता येईल".
कपडे काढून मंत्रोच्चार कर, रातोरात स्टार होशील...
सोनल पुढे म्हणाली,"त्या शूटिंगचा मी भाग नव्हते. पण कास्टिंग दिग्दर्शकाने मला काही आऊटफिट्स ट्राय करण्यास सांगितले. त्यानंतर जबरदस्तीने त्याने माझ्या ब्रेस्टवर क्रीम लावली. दिग्दर्शकाच्या या वागण्याने मी घाबरले होते. त्यानंतर मध्यरात्री तो जबरदस्तीने माझ्या खोलीत आला आणि म्हणाला,"कपडे काढून मंत्रोच्चार कर, रातोरात स्टार होशील". कास्टिंग दिग्दर्शकाने सोनलचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी अभिनेत्रीने तिथून पळ काढला. दरम्यान तिच्यासोबत कुटुंबातील कोणीच नव्हतं.
सोनल वेंगुर्लेकरने पुढे कास्टिंग दिग्दर्शकाविरोधात कस्तुरबा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यावेळी दिग्दर्शकाच्या पत्नीने अभिनेत्रीवर पैसे उकळल्याचा आरोप लावला. पैशांसाठी सोनल कास्टिंग दिग्दर्शकाला ब्लॅकमेल करायची असा आरोप त्यांनी केला. सोनल वेंगुर्लेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे. इंस्टावर तिने 10 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
संबंधित बातम्या