R Madhavan Son Gets Medals For India:  अभिनेता आर. माधवन (R Madhavan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आर. माधवनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  आर. माधवन हा सध्या त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. आर माधवन हा आपल्या मुलाला नेहमी सपोर्ट करतो. त्याचा मुलगा वेदांत हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे. वेदांतनं एका स्पर्धेत पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत. याबाबत आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. 


आर. माधवनचं ट्वीट



आर. माधवननं नुकतेच एक ट्वीट शेअर केले आहे. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलं,'देवाच्या कृपेने आणि तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांने वेदांतने क्वालालंपूर येथे या शनिवारी आणि रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मलेशियन इनव्हीटेशनल एज ग्रुप चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारतासाठी 5 सुवर्णपदकं (50, 100,200,400 आणि 1500 मी) जिंकली आहेत.' 


 आर. माधवननं वेदांतचे काही फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये वेदांत हा भारताचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसत आहे.वेदांतच्या गळात मेडल्स दिसत आहेत. त्यासोबत वेदांतची आई सरिता बिर्जे देखील या फोटोमध्ये दिसत आहे. 






आर. माधवननं शेअर केलेल्या या ट्वीटला कमेंट करुन अनेकांनी वेदांतचे कौतुक करुन त्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेता अभिषेक बच्चन यानं कमेंट केली, 'अमेझिंग, अभिनंदन, वेदांत' तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी कमेंट केली, 'सूवर्णपदकं जिंकल्याबद्दल अभिनंदन, बेस्ट ऑलवेज'






मध्य प्रदेशात पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांत माधवन याने जलतरण स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली होती. आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवननं 5 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकं खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये पटकावली होती.


आर. माधवनचे चित्रपट


काही महिन्यांपूर्वी आर.माधवनचा धोका हा चित्रपट रिलीज झाला. तर त्याच्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आर.माधवनच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. तनू वेड्स मनू, विक्रम वेधा या आर. माधवनच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


 इतर महत्वाच्या बातम्या: 


Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन