Mrunmayee Deshpande : मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande ) ही सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह असते. मृण्मयी ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच मृण्मयी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मृण्मयीच्या या फोटोला तिची बहीण गौतमी देशपांडेनं (Gautami Deshpande) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
मृण्मयीनं शेअर केला फोटो
मृण्मयीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला. 'मी पोचले महाबळेश्वर ला...' असं कॅप्शन मृण्मयीनं तिच्या फोटोला दिलं. या फोटोमध्ये मृण्मयी ही नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. मृण्मयीच्या फोटोला गौतमीनं कमेंट केली, 'ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा नाही घेतला.' गौतमीच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
पाहा फोटो:
मृण्मयीचे चित्रपट
काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा (Mrunmayee Deshpande ) चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटातील मृण्मयीच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले. मृण्मयीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. मृण्मयीनं मोकळा श्वास,नटसम्राट,आंधळी कोशिंबीर,कट्यार काळजात घुसली या चित्रपटांंमध्ये काम केलं आहे. तिनं कुंकू, अग्निहोत्र या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. काही दिवसांपूर्वी तिची 'शाब्बास सुनबाई' या मालिकेमध्ये एन्ट्री झाली. मृण्मयी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 759K फॉलोवर्स आहेत. मृण्मयी ही गौतमीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. मृण्मयी आणि गौतमी यांच्यामधील बाँडिंग चाहत्यांचे लक्ष वेधते.
गौतमीनं छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये केलं काम
माझा होशील ना या मालिकेमुळे गौतमी देशपांडेला (Gautami Deshpande) विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौतमीनं सई ही भूमिका साकारली. सारे तुझ्याचसाठी, माझा होशील ना या मालिकांमध्ये देखील गौतमीनं काम केलं.
इतर महत्त्वाच्या बातम्या: