एक्स्प्लोर

ऑनलाईन तिकीट बूक करताना इंटरनेट हँडलिंग फी उकळणं अवैध, आरटीआयमध्ये माहिती

ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार सिनेमाच्या तिकिटांचं ऑनलाईन बूकिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नसल्याचं रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकाराअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे.

मुंबई : मोबाईल अॅप किंवा वेबसाईटवरुन सिनेमाचं ऑनलाईन तिकीट बूक करण्यासाठी तुम्ही अतिरिक्त पैसे भरता का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तिकीट बूक करताना इंटरनेट हँडलिंग फी भरण्याची गरज नसल्याचं 'आरटीआय'मध्ये समोर आलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने माहितीच्या अधिकाराअंतर्गत ही बाब समोर आणली आहे. 'फोरम अगेन्स्ट करप्शन'चे अध्यक्ष विजय गोपाल यांनी हैदराबादेतील ग्राहक कोर्टात धाव घेतली आहे. बूकमायशो, पीव्हीआरविरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली आहे. ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी उकळण्याचा अधिकार चित्रपट तिकिटांचं ऑनलाईन बूकिंग करणाऱ्या प्लॅटफॉर्मना नाही, असं रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारा अंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं आहे. अशाप्रकारे अतिरिक्त फी आकारणं हे आरबीआयच्या व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काऊंट रेट-एमडीआर) नियमांचं उल्लंघन असल्याचंही यात नमूद केलं आहे. व्यापारी सवलत दर म्हणजे काय? क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांकडून पैसे स्वीकारल्याबद्दल व्यापारी बँकेला जी रक्कम देतात, तिला व्यापारी सवलत दर (मर्चंट डिस्काऊंट रेट-एमडीआर) म्हणतात. अर्थातच ही रक्कम व्यापारी/दुकानदारांनी सोसायची असती, तिचा भार ग्राहकांवर पडता कामा नये. त्यामुळे ग्राहकांकडून इंटरनेट हँडलिंग फी आकारणं अवैध असल्याचंही म्हटलं आहे. इंटरनेट हँडलिंग फीच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रक्कम उकळल्याचा आरोप अनेक प्रेक्षक करतात. त्यामुळे सिनेमाच्या तिकीटाची मूळ रक्कम जर दोनशे रुपये असेल, तर इंटरनेट हँडलिंग फीमुळे ही रक्कम 230 रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागतो. फक्त चित्रपटच नव्हे, कॅब सर्व्हिस, फूड डिलीव्हरी अॅप्सही इंटरनेट हँडलिंग फी आकारतात, असंही विजय गोपाल म्हणाले. नागरिकांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget