Pushpa The Rule : अभिनेता अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांचा चित्रपट 'पुष्पा द राईज' (Pushpa The Rise) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सुकमार यांनी अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार होता. त्याचा पहिला भाग पुष्पा द राईज गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि आता त्याचा पुढचा भाग पुष्पा द रुल या वर्षी रिलीज होणार आहे. पुष्पा द रुल (Pushpa The Rule) प्रदर्शित होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला या चित्रपटाविषयी काही गोष्टी सांगणार आहोत.


'पुष्पा' बनणार होती वेब सिरीज
काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील लाल चंदनाच्या लाकडाच्या तस्करीचे प्रकरण चर्चेचा भाग बनले होते. सुकुमार यांनी या विषयावर संशोधन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी त्यांना सहा महिने लागले. त्यांनी आधी यावर वेब सिरीज बनवणार असल्याचे सांगितले. पण नंतर त्यांनी ठरवलं की यावर चित्रपट बनवायचा.


सिक्वलसाठी रश्मिकाने घेतले इतके मानधन
पुष्पा द राईज हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने चित्रपटाच्या पहिल्या भागासाठी दोन कोटी रुपये घेतले होते. पण आता हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरल्याने रश्मिकाने या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी तिचे मानधन वाढवले आहे. ती पुष्पा द रुलसाठी तीन कोटी रुपये घेतले आहेत.


काय असेल 'पुष्पा द रुल'ची कथा
पुष्पा द राईजमध्ये अल्लू अर्जुनचे कुलीपासून स्मगलरमध्ये झालेले परिवर्तन दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या शेवटी फहाद फासिलची एन्ट्री होते. या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये दोन्ही कलाकारांचा आमनेसामने दाखवण्यात येणार आहे.


इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha