Telangana Silk Sarees : तेलंगणातील विणकरांनी माचिसच्या पेटीतही बसेल अशी सिल्क साडी तयार केली आहे. ही साडी खूपच अनोखी आहे. ही दुर्मिळ सिल्क साडी हाताने बनवली आहे. तेलंगणातील सिरसिल्ला येथील रहिवासी नल्ला विजय यांनी ही सिल्क साडी विणली आहे. हाताने साडी विणायला त्यांना सुमारे दोन आठवडे लागले. या साडीचे वजन सुमारे 100 ग्रॅम आहे. ही दुर्मिळ आणि अतिशय आकर्षक रेशीम साडी सुमारे साडेपाच मीटर लांबी आणि 46 इंच रुंदीची आहे.


तेलंगणातील विणकर विजयने अनेक मंत्र्यांसमोर हाताने विणलेल्या सिल्क साडीचे प्रात्यक्षिक दाखवले. ही साडी राज्याच्या शिक्षणमंत्री सबिता इंद्रा रेड्डी यांनाही भेट म्हणून देण्यात आली. विणकर विजय यांनी आयटी आणि नगरपालिका प्रशासन मंत्री केटी रामाराव यांची भेट घेण्यासाठी हैदराबादला प्रवास केला आणि मंत्री ई दयाकर राव आणि व्ही श्रीनिवास गौर यांच्यासमोर त्यांच्या कामाचे प्रात्यक्षिक केले. 100 ग्रॅम वजनाची साडी 5/3 इंच माचिसच्या पेटीमध्ये बसते. विणकरांच्या कामाचे मंत्र्यांनी कौतुक केले आहे.


विणकर विजय यांना हाताने साडी विणण्यासाठी सुमारे दोन आठवडे लागतात आणि त्याची किंमत 12,000 रुपये आहे. तसेच ही साडी मशीनवर विणल्यास तीन दिवस लागतात आणि त्याची किंमत आठ हजार रुपये आहे. विणकर नल्ला विजय यांना त्यांचे वडील नल्ला परंधमुलू यांच्याकडून विणकाम कला शिकली आहे. आपल्या कौटुंबिक परंपरा पुढे चालू ठेवत त्यांनी हातमागावर साडी विणतात. विणकर विजय यांनी सांगितले की, राज्य सरकारने दिलेल्या मदतीमुळे सरसिल्लामधील हातमाग क्षेत्रात अलीकडे बरेच बदल झाले आहेत.


विणकर विजय म्हणाले की, सिरसिल्लाचे विणकर आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणे स्वीकारून चांगले काम करत आहेत. विजयने विणलेली साडी यापूर्वी 2017 मध्ये वर्ल्ड तेलुगू कॉन्फरन्समध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनाही त्यांनी सुपर फाईन सिल्कची साडी भेट दिली होती.


इतर बातम्या :