एक्स्प्लोर

Pushpa - The Rise : पहिलं गाणं रेकॉर्ड ब्रेक, आता 'श्रीवल्ली' हे दुसरं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीला

Pushpa - The Rise : "पुष्पा- द राइज" सिनेमातील 'श्रीवल्ली' गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तशी घोषणा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केली आहे.

Pushpa - The Rise : "पुष्पा - द राइज" सिनेमातील पहिले गाणे 'जागो जागो बकरे' प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर अल्पावधीतच या गाण्याने सगळे रेकॉर्ड ब्रेक केलं होता. आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'श्रीवल्ली' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'श्रीवल्ली' गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केले आहे. जावेद अली यांनी हिंदीत तर सिड श्रीराम यांनी तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळममध्ये गायलेले आणि देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केलेले हे मधूर गाणे असणार आहे. 

'रश्मिका' पात्रावर आधारित गाणे
'श्रीवल्ली' गाण्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या गाण्याची उत्सुकता वाढली आहे. चित्रपटात रश्मिका कोणती भूमिका साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील हे दुसरे गाणे 'रश्मिका'च्या पात्रावर प्रकाश टाकण्याचे काम करत आहे. चित्रपटातील या गाण्याचे अनेक प्रेमळ पदर आहेत. तसेच या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे पाच भाषांत बनवलेले आहे. 2021 सालातील हे गाणे प्रचंड लोकप्रिय होणार आहे. 

इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी बनविलेले गाणे
रवी शंकर म्हणाले कि, "चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळणारे हे गाणे 13 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्याने आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. रश्मिकाने 'पुष्पा' सिनेमात साकारलेली भूमिका ही 'पुष्पा' चित्रपटाची आणि 'श्रीवल्ली' गाण्याची खासियत असणार आहे. चित्रपटातील या दुसऱ्या गाण्यातून पात्रांचे संगीतमय वर्णन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे गाणे जावेद अली आणि सिड श्रीराम यांनी स्वरबद्ध केले आहे तर देवी प्रसाद यांनी संगीतबद्ध केले आहे. त्यामुळेच आम्हाला आशा आहे कि प्रेक्षकांनादेखील हे गाणे नक्की आवडेल. हे गाणे इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकारांनी बनविलेले आहे. 

या दिवशी होणार 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित
अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिलचा 'पुष्पा' सिनेमा 17 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा दुसरा भाग 2022 सालात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

जाणून घ्या "हे"  चित्रपट कधी होणार प्रदर्शित
जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते 2 सिनेमा 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सुनील शेट्टीची मुलगी अहान शेट्टीचा चित्रपट 'तडप' 3 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' 19 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगन, रकुलप्रीत आणि अमिताभ बच्चनचा'May Day' 29 एप्रिल 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिद कपूर आणि मृणाल ठाकुरचा 'जर्सी' सिनेमा 31 डिसेंबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे. रणवीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त 'शमशेरा' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा सिनेमा 18 मार्च,2022 ला प्रदर्शित होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Subodh Bhave On Sai Tamhankar: 'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
'सई ताम्हणकर इंडस्ट्रीत कितपत टिकेल, याबाबत मला शंका...'; सुबोध भावेनं स्पष्टीकरणासह दिलं कारण, नेमकं काय म्हणाला?
Kajal Raghwani on Extra marital affair: 'विवाहित पुरुषासोबत माझे 5 वर्षे अफेअर'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा Reality शोमध्ये धक्कादायक खुलासा, म्हणाली...
'विवाहित पुरुषासोबत माझे 5 वर्षे अफेअर'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा Reality शोमध्ये धक्कादायक खुलासा, म्हणाली...
Bhojpuri film wanted: 'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
'वांटेड' सिनेमाच्या निर्मात्याच्या अडचणीत वाढ; मुंबईच्या अंधेरी परिसरातून अटक, फसवणुकीचा गुन्हा दाखल
Om Puri Wife Seema Kapoor Revealed Husbands Affair: 'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा
'ओम पुरींचे घरातल्याच मोलकरणीसोबतच संबंध...'; घटस्फोटीत पत्नीचा धक्कादायक दावा, अभिनेत्याच्या एक्स्ट्रा मॅरेटियल अफेअर्सबाबतही खुलासा

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget