Pushpa : अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॉटफॉर्मवरदेखील प्रदर्शित झाला. 'पुष्पा' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अनेक सिनेमे प्रदर्शित झाले असले तरी 'पुष्पा'ची क्रेझ कायम आहे. आता औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. 

Continues below advertisement


अल्लू अर्जुनचे चाहते, सिनेप्रेमी, क्रिकेटर यांच्यासह नेतेमंडळींमध्येदेखील 'पुष्पा' सिनेमाची क्रेझ दिसून आली आहे. सिनेमातील डायलॉग आणि गाणी  सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. अनेकांनी 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग्सवर व्हिडीओ बनवले आहेत. दरम्यान अल्लू अर्जुनच्या एका चाहत्याने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. 


औरंगाबादच्या सोहन कुमारने अल्लू अर्जुनचा पुतळा साकारला आहे. पुतळ्यात अल्लू अर्जुनने हातात बंदूक घेतलेली दिसत आहे. हा पुतळा सोहन अल्लू अर्जुनला त्याच्या वाढदिवसाला भेट म्हणून देणार आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासह फहाद फासिलचीदेखील सिनेमात प्रमुख भूमिका आहे. 'पुष्पा' सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पुष्पा' बनणार होती वेब सिरीज
काही वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशातील लाल चंदनाच्या लाकडाच्या तस्करीचे प्रकरण चर्चेचा भाग बनले होते. सुकुमार यांनी या विषयावर संशोधन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी त्यांना सहा महिने लागले.  आधी यावर वेब सिरीज बनवणार असल्याचे ठरले होते. पण नंतर सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला. 


संबंधित बातम्या


Kangana Ranaut Update: ‘अशा पालकांवर कारवाई करावी...’, ‘गंगूबाई काठियावाडी’चे डायलॉग बोलणाऱ्या चिमुकलीवर संतापली कंगना रनौत!


Rocketry Release Date : आर माधवनचा 'रॉकेट्री' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला


Glimpse of Radhe Shyam : प्रभासचं प्रेक्षकांना ‘व्हॅलेंटाईन डे’ सरप्राईज, ‘राधे श्याम’चे नवे पोस्टर रिलीज


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha