Taimur Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor-Khan) यांचा लाडका लेक तैमूर अली खान (Taimur Ali Khan) नेहमीच चर्चेत असतो. यंदाच्या व्हॅलेंटाइन डेला (Valentines Day) देखील खास तैमूरची चर्चा आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या प्रेयसी किंवा पत्नीसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना, चिमुकला तैमूर अली खान आपला ‘व्हॅलेंटाइन डे’ वेगळ्या पद्धतीने साजरा करताना दिसत आहे. करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूरचा हा क्यूट फोटो शेअर केला आहे.


तैमूरला या खास दिवशी फक्त त्याचे आवडते चॉकलेट आईस्क्रीम हवे आहे. तैमूर अली खानसाठी, त्याचे व्हॅलेंटाईन हे त्याचे आवडते चॉकलेट आईस्क्रीम आहे, ज्याचा तो आनंदाने आस्वाद घेत आहे.


पाहा पोस्ट :



करीना कपूर-खानने तैमूर अली खानचा हा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चॉकलेट आईस्क्रीमचा आस्वाद घेताना दिसत आहे. तैमूर अली खानचे वडील सैफ अली खान सेल्फी फोटो क्लिक करताना दिसत आहेत.


सैफ-करीनाचा लाडका तैमूर


करीना कपूर खानच्या या फोटोला काही मिनिटांत लाखो लाईक्स मिळाले आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, 'मॅगनम.'  अनेक चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांनी लग्न गाठ बांधली होती. तैमूर अली खान हा त्यांचा मोठा मुलगा आणि जहांगीर अली खान हा त्यांचा लहान मुलगा आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha