Allu Arjun Pushpa 2 OTT : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या चर्चेत आहे. अल्लूचा 'पुष्पा' (Pushpa) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने सिनेमागृहात धमाका केला. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. लवकरच हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे.


'पुष्पा' हा सिनेमा अल्लू अर्जुनच्या करिअरमधला गेम चेंजर सिनेमा ठरला होता. आता 'पुष्पा 2' (Pushpa 2) या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता सज्ज आहे. या सिनेमाची सिनेरसिकांना आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


'या' ओटीटीवर रिलीज होणार 'पुष्पा 2' (Pushpa 2 OTT Release)


सिनेमागृह गाजवल्यानंतर 'पुष्पा' हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. प्राइम व्हिडीओने 30 कोटी रुपयांत या सिनेमाचे राईट्स विकत घेतले होते. पण आता 'पुष्पा 2' या सिनेमाचे राईट्स नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने विकत घेतले होते. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओने दिलेल्या रकमेपेक्षा तीस टक्के जास्त नेटफ्लिक्सने दिले असल्याचं समोर आलं आहे. 'पुष्पा 2' या सिनेमाचे ओटीटी राईट्स 90 कोटी रुपयांत विकले गेले आहेत. 






'पुष्पा 2' कधी होणार रिलीज? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा 2' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी खास पोस्ट शेअर करत सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. 'पुष्पा 2' या सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पुन्हा एकदा अल्लू अर्जुन पुष्पाच्या आणि रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच फहद फासिल पुन्हा एकदा एसपी भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेत दिसणार आहे. 


'पुष्पा' हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. देशभरात हा सिनेमा चांगलाच गाजला. आता या सिनेमाचा दुसरा भाग रिलीजसाठी सज्ज आहे. सुकुमार या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 'पुष्पा 2' या सिनेमासह अल्लू अर्जुनच्या आगामी सिनेमांचीही चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


संबंधित बातम्या


Allu Arjun : 'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनने मानधन घेतलं नाही, पण..; करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या स्ट्रॅटर्जी