Pooja Sawant : 'कलरफुल' पूजा सावंत (Pooja Sawant) कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पण आता अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 


पूजा सावंतच्या पोस्टवर एकीकडे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. तर दुसरीकडे मात्र काही चाहत्यांचा 'हर्टब्रेक' झाला आहे. पुजाने तिच्या जोडीदारासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने जोदीदाराची झलक दाखवली असली तरी त्याचा चेहरा मात्र स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे पूजाचा जोडीदार नक्की कोण? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. पूजा सावंतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पूजाने चाहत्यांना आनंदाची बातमी देत लिहिलं आहे,"आयुष्याचा एका नव्या अध्यायाची एका नव्या व्यक्तीसोबत सुरुवात".



पूजाने तिच्या जोडीदारासोबतचे तीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करण्यासोबत तिने खास रोमँटिक कॅप्शनही दिलं आहे. समुद्रकिनाऱ्याजवळील एक फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"आयुष्याच्या नव्या अध्यायाची एका खास व्यक्तीसोबत सुरुवात करत आहे". दुसरा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे,"प्रेमाची जादू कमाल आहे, नव्या प्रवासाची सुरुवात". तर तिसरा फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिलं आहे,"We Are Engaged". 


पूजा सावंतने आपल्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तसेच ती एक उत्तम नृत्यांगनाही आहे. काही दिवसांपूर्वी भार्गवी चिरमुलेला दिलेल्या मुलाखतीत लग्नाबद्दल बोलताना पूजा म्हणालेली,"माझा लिव्ह इनपेक्षा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. मला लग्न करायचं आहे. आयुष्यात स्थिरता हवी आहे. त्यामुळे ज्याच्यासोबत उरलेलं आयुष्य आनंदात घालवू शकते असा पार्टनर हवा आहे".


पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. 


संबंधित बातम्या


Pooja Sawant : गणेशचतुर्थीपासून पुढचे दहा दिवस माझं डाएट बंद; मोदकावर ताव मारायला पूजा सावंत सज्ज