Allu Arjun Pushpa 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) 'पुष्पा' (Pushpa) हा सिनेमा चांगलाच गाजला असून आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची सिनेरसिकांना उत्सुकता आहे. 'पुष्पा' या सिनेमानंतर अल्लू अर्जुन पॅन इंडिया स्टार झाला. जगभरातील चाहत्यांनी या सिनेमाचं आणि अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं कौतुक केलं. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने धुमाकूळ घातला. आता 'पुष्पा 2'ची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.


अल्लू अर्जुनने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलं आहे. 'पुष्पा'ची स्टाइल, गाणी, डायलॉग सर्वच सुपरहिट ठरलं आहे. चाहते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. 'पुष्पा' सिनेमा पाहिलेला प्रत्येक जण या सिनेमासाठी खूप उत्सुक आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


'या' सिनेमासाठी अल्लू अर्जुनने मानधन घेतलं नाही...


'पुष्पा 2' संदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने काहीही मानधन घेतलेलं नाही. 'पुष्पा' हा सिनेमा सुपरहिट ठरल्यानंतर अल्लू अर्जुनने आपल्या मानधनात वाढ केली असल्याची चर्चा होती. पण मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन 'पुष्पा 2' हा सिनेमा मोफत करत आहे. या सिनेमासाठी त्याने काहीही मानधन घेतलेलं नाही. पण तरीही तो सिनेमा रिलीज झाल्यानंतर कोट्यवधी रुपयांची कमाई करणार आहे. सिनेमाच्या एकूण कमाईतील 33% मात्र अल्लू अर्जुन घेणार आहे. 


'पुष्पा'च्या ओटीटी राइट्सबद्दल जाणून घ्या...


'पुष्पा' या सिनेमाचे ओटीटी राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने 30 कोटी रुपयांत विकत घेतले होते. आता 'पुष्पा 2' या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्स विकत घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


'पुष्पा 2' या सिनेमात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच फहद फासिल, रश्मिका मंदाना, सुनील, प्रकाश राज, जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'पुष्पा 2' हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'पुष्पा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. अॅमेझॉन प्राइम ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतील. या सिनेमातील 'ऊ अंटवा' सामी सामी, श्रीवल्ली या गाण्यांवर चाहते थिरकताना दिसतात. या सिनेमातील झुकेगा नहीं साला हा डायलॉग चांगलाचं गाजला होता. 


संबंधित बातम्या


Pushpa 2 The Rule: पुष्पा-2 ची रिलीज डेट जाहीर; अल्लू अर्जुनचा चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला