Pushpa 2 Latest News :  सध्या 'पुष्पा-2' (Pushpa 2) या चित्रपटाचे चित्रीकरण  जोमाने सुरू असून 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वीच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) वाढदिवसाच्या निमित्ताने 'पुष्पा-2' मधील त्याचा टीझर लाँच करण्यात आला. या चित्रपटाबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. या चित्रपटावर प्रचंड खर्च करण्यात येत असून जवळपास 500 कोटींचे बजेट असल्याचे म्हटले जात आहे. 'पुष्पा 2' बॉक्स ऑफिसवरील कमाईचे आकडे मोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच रिलीजपूर्वी 'पुष्पा 2' ने 160 कोटींची कमाई केली असल्याचे म्हटले जात आहे. 


6 मिनिटाच्या सीनसाठी 60 कोटींचा खर्च


सहा मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी सुमारे 60 कोटी रुपये खर्च केले असून आणि सीन पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागले. सूत्रांच्या माहितीनुसार, या सीनमध्ये गंगाम्मा जत्रा आणि त्यातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. 


रिलीज आधीच कमाई 


पुष्पा 2 चे बजेट 500 कोटी रुपये आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी जगभरातील संगीताचे हक्क आणि हिंदी सॅटेलाइट हक्क टी-सीरीजला 60 कोटी रुपयांना विकले आहेत. 'स्टार मां' या वाहिनीने तेलुगू सॅटेलाइट राइट्सही विकत घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, ही डील किती रुपयांमध्ये झाली, याची माहिती अद्याप समोर आली नाही. 


'पुष्पा 2'च्या ओटीटी रिलीजची डील


थिएटरमध्ये चित्रपट रिलीज होण्याआधीच ओटीटी रिलीजबाबत डील झाल्याची जोरात चर्चा सुरू आहे. पुष्पा-2 च्या निर्मात्यांनी ओटीटी रिलीजसाठी नेटफ्लिक्ससोबत करार केला असल्याची चर्चा सुरू आहे. ही डील 100 कोटींना झाली असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मात्यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली नाही. 


पाहा 'पुष्पा 2'चा टीझर : Pushpa 2 The Rule Teaser | Allu Arjun | Sukumar | Rashmika Mandanna | Fahadh Faasil | DSP



'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)


'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार  आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


इतर संबंधित बातमी :