Kadambari Kadam : 'तुजविण सख्या रे' या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री कादंबरी कदम (Kadambari Kadam) घराघरांत पोहोचली. आता अभिनेत्रीने नुकतचं 'आरपार' या युट्यूब चॅननला मुलाखत दिली आहे. "हे काम मुलीचं, ते काम मुलाचं ही मानसिकता कधी बदलणार", असा सवाल कादंबरी कदमने उपस्थित केला आहे. तिला पडणारे प्रश्न, तिच्याकडे असणारी उत्तरही अगदी चार चौघींसारखी आहेत. कादंबरी कदमचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधील तिच्या मतांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


'आरपार'ला दिलेल्या मुलाखतीत कादंबरी कदम म्हणाली होती,"दादा थकून घरी आलाय. त्यामुळे घरात त्याने दोन गोष्टी नाही केल्या तरी चालतात. तू थकून आली आहेस नाही... तर तू आता आली आहेस. सकाळपासून तो तुझी वाट बघतोय. तुम्ही वडील जेव्हा परत येतात तेव्हा असं मुलाला कोणी सांगत नाही. आपण त्यांना म्हणतो थांब बाबा दमून आलेत. बाबांना हात पाय धुवू दे आधी, त्यांना आधी चहा पिऊ दे पण तेच आई आली की आपण तिला म्हणतो,"काय गं कधीपासून तुझी वाट बघतोय. हा फरक आहेच ना".


कादंबरी पुढे म्हणाली,"मी त्यादिवशी हे बघितलं की, ट्विंकल खन्ना कोणाची तरी मुलाखत घेत होती त्यावेळी ती म्हणाली, आता आपण सगळं करतोय पैसा कमावतोय, हे करतोय ते करतोय तरीपण उद्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न का आहे? जरी तुमच्याकडे स्वयंपाक करणारी बाई असली तरी ती तुम्हाला विचारते ताई काय बनवायचं? म्हणाना दादा काय बनवायंय दुपारच्या जेवणात?".  






एका मुलाची आई असणं खूप जबाबदारीचं कारण : कादंबरी कदम


कादंबरी कदम एका मुलाची आई आहे. याबद्दल ती म्हणते,"एका मुलाची आई असणं खूप जबाबदारीचं आहे. तुमची जबाबदारी दुपटीने वाढते. सुरुवातीपासूनच मी माझ्या मुलाला भातुकली आणून दिली आहे. बाहुल्या आहेत माझ्या मुलाकडे. त्यामुळे तो बाहुलीला झोपवतो, जेवण बनवतो, कारण त्याला असं वाटायला नको की हे बायकांचं काम आहे. मी माझी मतं मुलावर लादण्याचा प्रयत्न करत नाही.


संबंधित बातम्या


Rajshri Deshpande : "फक्त BOLD SCENES' दाखवणं हा निव्वळ आळशीपणा"; राजश्री देशपांडे स्पष्टच म्हणाली