Pushpa 2 Teaser launch Allu Arjun Look : अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) वाढदिवसाच्या दिवशी  आज मोस्ट अवेटेड 'पुष्पा 2'चा  (Pushpa 2: The Rule) टीझर आज लाँच झाला. या टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग दिसून आला. टीझरमध्ये अल्लू अर्जुनच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. अल्लू अर्जुनने या टीझरमध्ये साडी नेसली असून संपूर्ण अंगावर निळा रंग आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनची अॅक्शन दिसून आली. 

Continues below advertisement

अल्लू अर्जुनने नेसली साडी 

टीझरमध्ये जत्रा होत असल्याचे दाखवण्यात आले आहे. यामध्ये अनेक लोक देवीच्या नावाचा जप आणि प्रार्थना करत आहेत. यानंतर अल्लू अर्जुन दिसतो. या टीझरमध्ये अल्लू हा अर्धनारीच्या लूकमध्ये दिसला.  त्याची दाढी, कुरळे केस, चालण्याची पद्धत अगदी मर्दानी दिसते. पण साडी, डोळ्यातील काजळ, लांब नखे, घुंगरू, झुमके, बांगड्या आहेत. याच अवतारात अल्लू अर्जुन गुंडांशी दोन हात करतो. 

मातंगी वेशम

कपड्याशिवाय एका दृश्यात अल्लूने शरीराला निळा रंग लावला आहे.  हा मातंगी अवतार असल्याचे म्हटले जाते.  अशी वेशभूषा साधारणपणे पुरुष अथवा स्त्री तिरुपतीमध्ये गंगम्मा थल्ली जत्रेच्या सहाव्या दिवशी परिधान करतात. 'पुष्पा: द राइज' या चित्रपटातील डाक्को...डाक्को...मेका यामध्ये जत्रेचा संदर्भ देण्यात आला होता. त्याच्या माध्यमातून पुष्पाची एक बॅकस्टोरीची पार्श्वभूमी तयार केली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, गंगम्मा थल्ली जत्रेतील हे दृष्य चित्रपटासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

'पुष्पा 2' कधी रिलीज होणार? (Pushpa 2 Release Date)

'पुष्पा 2 - द रुल' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज होणार आहे.  या चित्रपटाचे बजेट 500 कोटींच्या घरात असल्याचे म्हटले जात आहे. भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये 'पुष्पा 2'चा समावेश असणार आहे. 'पुष्पा 2: द रूल' (Pushpa 2 : The Rule) हा 'पुष्पा : द राइज' (Pushpa : The Rise) या चित्रपटाचा सीक्वेल असणार  आहे. 'पुष्पा'च्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. त्यामुळे आता हा सीक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

पाहा टीझर : Pushpa 2 The Rule Teaser | Allu Arjun | Sukumar | Rashmika Mandanna | Fahadh Faasil | DSP

इतर संबंधित बातमी :