एक्स्प्लोर

प्रजासत्ताक दिनी ‘पॅडमॅन’ विरुद्ध ‘पद्मावती’ टक्कर

बॉक्स ऑफिसवर पद्मावती आणि पॅडमॅन हे दोन्ही सिनेमे समोरासमोर उभं ठाकण्याची चिन्हं आहेत. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी या दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी 25 जानेवारीला आपले सिनेमे प्रदर्शित करण्याच निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.

मुंबई : बॉक्स ऑफिसवर पद्मावती आणि पॅडमॅन हे दोन्ही सिनेमे समोरासमोर उभं ठाकण्याची चिन्हं आहेत. प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधण्यासाठी या दोन्ही चित्रपटाच्या निर्मात्यांनी 25 जानेवारीला आपले सिनेमे प्रदर्शित करण्याच निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटासाठी आधीपासूनच 26 जानेवारी ही प्रदर्शनाची तारीख निश्चित करण्यात आली होती. तर ‘पद्मावती’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं, त्याची तारीख निश्चित नव्हती. मात्र आता प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून अधिक कमाई करण्याच्या उद्देशानं ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनीही 25 तारखेलाच सिनेमा प्रदर्शित करण्याचं निश्चित केल्याचं वृत्त पीटीआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. दरम्यान, संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावती' चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्र देण्याची तयारी सेन्सॉर बोर्डाने दाखवली आहे. मात्र, सिनेमासंदर्भातील वाद संपण्याची चिन्हं दिसत नाहीत. पूर्व मेवाड राजघराण्यातील सदस्य विश्वराज सिंह यांनी सीबीएफसीच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. सेंसॉर बोर्ड अत्यंत बेजबाबदार असल्याचं सांगत त्यांनी ‘पद्मावती’बाबत परस्पर निर्णय घेतल्याचा आरोप विश्वराज सिंह यांनी केला आहे. तर सिनेमाचं नाव बदलण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी काही दिवसांपूर्वीच दिल्या होत्या. सिनेमाची कथा काल्पनिक कवी ‘पद्मावत’ यांच्या कलाकृतीवर आधारीत असल्याचं दिग्दर्शकाने सांगितलं होतं. त्यामुळे भन्साळींना सिनेमाचं नावही ‘पद्मावत’ ठेवण्यास सांगितल्याचं सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ बाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सूकता आहे. या सिनेमातून अक्षय कुमार सॅनिटरी पॅडबाबत जागरुकता करताना दिसणार आहे. येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आर बाल्की यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, ‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावती’सोबत आणखी एक सिनेमेही प्रदर्शित होत आहे. नीरज पांडे यांचा 'अय्यारी' आणि अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' एकाच दिवशी रिलीज होतो आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vicky Kaushal on Aamir Khan: आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
आमिर खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार; 'छावा'फेम अभिनेता विक्की कौशलची प्रतिक्रिया, हसून म्हणाला..
Bobby Deols Aashram Season 4: पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
पुन्हा गाजणार 'बाबा निराला'! चौथ्या सिझनबाबत मोठी अपडेट समोर, शूटिंग कधी सुरू होणार?
Sunil Pal On Samay Raina Indias Got Latent 2 Show: 'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
'समय रैनानं 25 लाखांची ऑफर दिलेली, पण...', 'इंडियाज गॉट लेटेंट'बाबत सुनील पाल यांचा खुलासा, आलिया भटवर साधला निशाणा
Eetha Film Viithabai Narayangaonkar: 'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'
'ईठा' सिनेमाच्या शीर्षकावरुन वाद, मोठ्या लेकीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, 'सिनेमाच्या नावावर आमचा आक्षेप...'

व्हिडीओ

Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
Embed widget